बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीआॅनलाईन प्रश्नपेढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 19:46 IST2018-10-18T19:44:44+5:302018-10-18T19:46:15+5:30
औरंगाबाद : देशपातळीवर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. यात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, त्याची तयारी चांगली व्हावी, या उद्देशाने विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात बदल केला आहे. बदल केलेली प्रश्नपेढी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आॅनलाईन उपलब्ध करून दिली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीआॅनलाईन प्रश्नपेढी
औरंगाबाद : देशपातळीवर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. यात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, त्याची तयारी चांगली व्हावी, या उद्देशाने विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात बदल केला आहे. बदल केलेली प्रश्नपेढी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आॅनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या परीक्षेवेळी या प्रश्नपेढीचा उपयोग बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मंडळाने कळविले आहे.
विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ११ वीच्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात आला होता. तर १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात बदल केला जाणार आहे. त्यासाठी राज्य मडळामार्फत व विभागीय मंडळांमार्फत ११ वी व १२ वीच्या मूल्यमापन योजनेत झालेला बदल अवगत करून देण्यासाठी विषयांप्रमाणे मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व विषय शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. यासंदर्भातील ११ वी आणि १२ वीच्या उपरोक्त विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका सुद्धा मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
१२ वी च्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या सरावासाठी उद्दिष्टानुसार व प्रश्नप्रकारांनुसार गुणविभागणी आणि पाठांनुसार गुणविभागणही मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील शिक्षकांनी अभ्यासपूर्ण व वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार कलेले असून, या प्रश्नांचे तज्ज्ञांमार्फत परीक्षण केल्यनंतर ते या प्रश्नपेढीत उपलब्ध करून दिले आहे. प्रश्नपेढी अधिक समृद्ध व निर्दोष होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यास त्याचाही मंडळातर्फे विचार केला जाणार असल्याचे मंडळातर्फे कळविले आहे.
हा होईल प्रश्नपेढीचा उपयोग
यावर्षी १२ वी येणाºया प्रश्नांच्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांना पूर्ण कल्पना येईल, प्रश्नपत्रिका आराखड्याबाबतची भिती व गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनातून जाईल, प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना भरपूर सराव होईल, शिक्षकांना नवनवीन प्रश्न तयार करण्याची कल्पना येईल आणि विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.