शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईनचा फंडा; मनपाला २० कोटींचा गंडा

By admin | Updated: February 10, 2015 00:34 IST

औरंगाबाद : शहरात आॅनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मनपाला चार वर्षांमध्ये वर्षाकाठी ५ कोटी याप्रमाणे २० कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे

औरंगाबाद : शहरात आॅनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मनपाला चार वर्षांमध्ये वर्षाकाठी ५ कोटी याप्रमाणे २० कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे. चार वर्षांत पहिल्यांदाच मनपाने वेगवेगळ्या कंपन्यांकडून आलेला अडीच कोटी रुपयांचा माल कुरिअर कार्यालयातून जप्त केला आहे. सात दिवसांमध्ये तो माल संबंधित कंपन्यांनी सोडून न्यावा. मागील चार वर्षांतील उलाढाल सादर करून त्याची दंडनिहाय रक्कम भरावी, अशी नोटीस एलबीटी कक्षाने कंपन्यांना बजावली आहे. पालिकेच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा खाबूगिरीमुळे आजवर आॅनलाईन ट्रेडिंग करणाऱ्यांना मोकळेरान होते. आयुक्त पी. एम. महाजन, उपायुक्त किशोर बोर्डे, एलबीटी अधिकारी अय्युब खान, शहर अभियंता एस. डी. पानझडे आदींनी पत्रकार परिषदेत मनपाने आॅनलाईन खरेदीला यापुढे चाप बसविणार असल्याचे सांगितले. आयुक्त महाजन म्हणाले, पोलीस सायबर सेल, मोबाईल कंपन्यांची मदत घेऊन आॅनलाईन नोंदणी करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. तसेच कंपन्यांना नोटीस दिली आहे. कंपन्या स्वत: नोंदणी करतील असे वाटले होते. म्हणून आजवर कारवाई केली नाही. मोबाईल अ‍ॅप्स सर्व्हिस प्रोव्हायडरवर करडी नजर ठेवू. शहरातून रोज ५५ लाख रुपयांची आॅनलाईन खरेदीसाठी नोंदणी होत असल्याचा अंदाज खान यांनी व्यक्त केला. त्यातून सव्वालाख रुपयांचा एलबीटी मनपाला रोज मिळणे गरजेचे आहे. तो महसूल बुडतो आहे, असे एलबीटी अधिकारी खान यांनी सांगितले. ४महिन्याला १५ ते १६ कोटी रुपयांच्या आसपास, तर वर्षाला २०० कोटी रुपयांच्या आसपास आॅनलाईन खरेदी केली जात आहे. २०११ पासून एलबीटी मनपा हद्दीत आहे.४मागील चार वर्षांत मनपा हद्दीत वरील उलाढालीनुसार ८०० कोटींच्या चैनीच्या वस्तू आॅनलाईन शहरात आल्या असून, त्यातून अंदाजे २० कोटी रुपयांचा एलबीटी मनपाला मिळालेला नाही. मागील तीन वर्षांत आॅनलाईन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.