शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून

By admin | Updated: June 22, 2014 00:51 IST

औरंगाबाद : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक आणि विविध कोर्सेससाठी २७ जून ते ६ जुलैदरम्यान आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

औरंगाबाद : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक आणि विविध कोर्सेससाठी २७ जून ते ६ जुलैदरम्यान आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे यावर्षी प्रथमच शहरात १३ ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म रिसिप्ट सेंटर (ए.आर.सी.) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून तंत्रशिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची लगभग सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना २६ जून रोजी गुणपत्रिका प्राप्त होणार आहेत. २७ जूनपासून पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. जे विद्यार्थी पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना अप्लिकेशन रिसिप्ट सेंटरवर अ‍ॅडमिशन किट खरेदी करावी लागेल. खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपयांना, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ते ३०० रुपयांना मिळणार आहे. एआरसी सेंटरवर शैक्षणिक कागदपत्रांसह हजर राहून विद्यार्थ्यांना नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर अ‍ॅडमिशन किट देण्यात येईल. शहरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी कॉलेज, जेएनईसी, पीईएस अभियांत्रिकी कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक अभियांत्रिकी कॉलेज, वाळूज, सावित्रीबाई महिला अभियांत्रिकी कॉलेज, इंटरनॅशनल सेंटर कॉलेज आॅफ एक्सलन्स, छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी कॉलेज आणि औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे हे एआरसी सेंटर आहे. या सेंटरवर विद्यार्थ्यांना ५० रुपये शुल्क भरून इंटरनेट, झेरॉक्स आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. शासकीय तंत्रशिक्षणमध्ये ६२० जागाशासकीय तंत्रशिक्षण संस्थेमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आॅटोमोबॉईल, कॉम्प्युटर, आय.टी., ड्रेस डिझाईन, गारमेंट डिझाईन आदी पदविका कोर्सेस आहेत. सकाळी ७ ते २ या शिफ्टसाठी ४४०, तर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या दुसऱ्या शिफ्टसाठीची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२० असल्याचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. या स्वायत्त संस्थेत मेरिटनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.