शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची फोडणी महागली

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत.

नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत.भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र अर्थिक झळ सोसावी लागत आहे. शहरातील बाजारात जिल्ह्याच्या विविध भागासह हिंगोली, परभणी, लासलगाव, नाशिक, पिंपगाव, बसवंत, सोलापूर, अहमदनगर, आंध्रा, कर्नाटक आदी ठिकाणाहून कांदा येतो. पावसाळ््यास प्रारंभ होऊनही अद्याप पाऊस आलाच नसल्याने याचा परिणाम आठवडी बाजारावरही जाणवू लागला आहे. कांदा काढणीच्यावेळी बाजारात आठवड्यात ४० ते ५० गाड्या कांदा दाखल होत होता. यामुळे प्रतिक्विंटल दर ५० ते ६०० रुपयावर आले होते. मात्र आजघडीला आवकच कमी झाल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.शेतकरी त्यांच्याकडील कांदा काढणी केल्यानंतर तेव्हांच विक्री करुन मोकळा झाला. मात्र आज बाजारात येणारा सर्व कांदा व्यापाऱ्यांनी साठेबाजी करुन ठेवलेलाच आहे. यामुळे या भाववाढीचा शेतकऱ्यांना तीळमात्र फायदा होणार नसून व्यापारीच मालामाल होणार आहेत.मे महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ४ रुपयापासून ८ रुपयापर्यंत होते. मात्र आवक घडल्यामुळे कांद्याचे दर २५ ते ३० रुपयावर जाऊन ठेपले आहेत. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडील कांदा संपतो त्यावेळी मात्र बाजारातील भाव गगनाला भिडतात. परंतु शेतकऱ्यांकडील कादां बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना फुकटभाव विक्री करावी लागतो. कांद्यांचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी दर ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. उत्पादित कांद्याची साठवणुक करण्यासाठी अधुनिक कांदाचाळ नसल्याने काढलेला कांदा, थेट बाजारात आणून विक्री करावा लागतो.दरम्यान, कांद्यासह इतर भाजेपाल्या, पेट्रोल, डिझेलचे भावही सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य अगदी मेटाकुटीला आले आहेत़ त्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजाही संकटात सापडला आहे़ (प्रतिनिधी)