खेळताना एक वर्षीय बाळाचा बादलीत बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 08:03 PM2019-07-31T20:03:21+5:302019-07-31T20:05:24+5:30

नातेवाईक घरकामात व्यस्त असल्याने उशिरा गेले लक्ष

One-year-old baby drowns in a bucket while playing | खेळताना एक वर्षीय बाळाचा बादलीत बुडून मृत्यू 

खेळताना एक वर्षीय बाळाचा बादलीत बुडून मृत्यू 

googlenewsNext

पाचोड (औरंगाबाद ) : कल्याण नगर भागात राहणाऱ्या एका पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या एक वर्षीय मुलाचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना बुधवारी (दि.३१) दुपारी घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड येथील कल्याण नगर भागात डॉ. शेख जाहिरोद्दीन पशुवैद्यकीय अधिकारी राहतात. आज सकाळी त्यांचा १ वर्षाचा मुलगा घरात खेळत असताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. यावेळी इतर नातेवाईक घरकामात व्यस्त होते. काही वेळानंतर बाळ बादलीत पडल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 

Web Title: One-year-old baby drowns in a bucket while playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.