शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

एक शस्त्रक्रिया अन् १५ रक्त पिशव्या; डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने महिलेला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 7:28 PM

अनेक दवाखान्यांत लागेल तो खर्च करण्याची तयारी दाखवली. मात्र, सगळ्यांनी हात वर करून घाटीकडे बोट दाखवले.

ठळक मुद्देघाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रतज्ज्ञांच्या प्रयत्नांना यशगर्भवतींनी ५ व्या महिन्यांच्या सोनोग्राफीत निदान करून घ्यावे

औरंगाबाद : पाच महिन्यांच्या गर्भवती मुलीच्या प्रसूतीत गुंतागुंत असल्याने बीडमध्ये खाजगी रुग्णालयात सिझेरियन केले. बाळ जगले नाही. रक्तस्रावही सुरू झाला. तो थांबत नसल्याने त्या डॉक्टरांनी औरंगाबादला पाठवले. अनेक दवाखान्यांत लागेल तो खर्च करण्याची तयारी दाखवली. मात्र, सगळ्यांनी हात वर करून घाटीकडे बोट दाखवले. घाटीत पोहोचलो. डॉक्टरांनी धीर देत १५ रक्तपिशव्या लावत यशस्वी शस्त्रक्रिया करून मुलीचा जीव वाचवल्याचे रुग्णाची आई शोभा जोगदंड सांगत होत्या.

रुग्ण पायल गायकवाड (वय २९, रा. कळसुंबर, जि. बीड) म्हणाल्या. पहिले सिझेरियन झाले होते. पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीत गर्भपिशवीत वार वरच्या बाजूस चिकटलेला होता. खाजगी दवाखान्यात २४ जुलैला सिझेरियन केले. तिथे बाळ वरून काढल्यावर रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी औरंगाबाद गाठायला सांगितले. रस्त्यात अनेक डॉक्टरांना दाखवले. त्यांनी गुंतागुंत अधिकच वाढल्याने घाटीतच जाण्याचा सल्ला दिला. २५ जुलैला दुपारी २ वाजता घाटीत भरती केले. एकूण १५ रक्तपिशव्या लावल्या. इथे आल्यावर डॉक्टरांनी पुन्हा आॅपरेशन केले. आॅपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिलेला धीर आणि टीमच्या प्रयत्नांमुळेच मला  जीवदान मिळाले, १४ दिवसांनंतर आज घरी जातेय. माझा लहान मुलगा घरी वाट पाहतोय. त्याला भेटू शकेल, ते फक्त घाटीच्या डॉक्टरांमुळे, असे म्हणत पायल यांनी डॉक्टरांचे आभार मानले.

या टीमचे प्रयत्नस्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. अंकिता शहा, डॉ. मलिका जोशी, डॉ. श्रुतिका मकडे, डॉ. सौजन्या रेड्डी, डॉ. सुस्मिता पवार, डॉ. शंतनू पाटील, डॉ. ऋ तुजा पिंपरे, डॉ. मयुरा कांबळे, डॉ. गौरी केनी, डॉ. पायल राठोड, डॉ. हिनानी बॉक्सी, परिचारिका सुनीता असलवले, जयमाला काळसरपे, मंगल देवूलवाड, संजय राहणे, हिना इनामदार आदींनी शस्त्रक्रिया व त्यानंतर १४ दिवस पायलची देखभाल केली.

गर्भवतींनी ५ व्या महिन्यांच्या सोनोग्राफीत निदान करून घ्यावेपूर्वी अशा केसेस २० हजारांत एक पाहायला मिळत होत्या. आता हे प्रमाण ५३४ सिझेरियन झालेल्या महिलांत एका महिलेत आढळून येते. अशा केसेसमध्ये माता मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. तेथील डॉक्टरांनी कपडा लावून शक्य ते प्रयत्न करून पाठवले. मात्र, बीडमध्येही हे आॅपरेशन शक्य होते. प्रत्येक गर्भवती महिलेने पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीत गर्भपिशवीत प्लासेंटा खालच्या बाजूने चिकटलेला आहे का याचे निदान करून घेतले पाहिजे. त्यामुळे प्रसूतीवेळीचा रक्तस्राव टाळता येऊ शकतो.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रिरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी रुग्णालय

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी