शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता एक, बाता अनेक! छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्ता रुंदीकरणाला राजकीय ब्रेक

By विकास राऊत | Updated: October 10, 2023 15:02 IST

एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआय तिन्ही संस्थांमधील त्रांगडे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा विद्यमान रस्ता ग्रीनफिल्ड अंतर्गत एक्स्प्रेस-वेमध्ये करण्याची २०२१ मध्ये घोषणा करण्यात आली. परंतु, या रस्त्याच्या कामाला राजकीय ब्रेक लागल्याची चर्चा आहे. ‘रस्ता एक आणि बाता अनेक’ अशी अवस्था या रस्त्याबाबत झाली असून, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआय तिन्ही संस्था एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.राजकीय इच्छाशक्तीअभावी या रस्त्याच्या रुंदीकरणाला गती मिळत नसून आजवर फक्त कागदोपत्रीच या रस्त्याचे काम पुढे सरकल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला भूसंपादनाबाबत अद्याप काहीही सूचना नाहीत. भूसंपादन संस्थांकडून प्रस्ताव येत नाहीत, तोपर्यंत जिल्हा प्रशासन काहीही सांगू शकणार नाही. मध्यंतरी काम सुरू केले होते. सर्व्हे करण्यात आला. परंतु, ते कामही थांबले. पुढे यात काहीही सूचना न आल्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या ४५ किमी रस्त्याच्या भूसंपादनाबाबत काहीही निर्णय नाही, असे सूत्रांनी सांगितले.

स्थानिक कार्यालयाने काय सांगितले?छत्रपती संभाजीनगरच्या एमएसआरडीसीकडे याबाबत काहीही माहिती नाही. भूसंपादनाचे काम एमएसआरडीसीकडे आहे. एनएचएआयने ग्रीनफिल्ड म्हणून भूसंपादनासाठी एमएसआरडीसीला सांगण्यात आले. पुणे विभागाकडे ती जबाबदारी देण्यात आली.

एमएसआरडीसी (पुणे) काय म्हणते?राज्य सरकारने तो रस्ता विकसित केलेला आहे. त्यावर टोल आहे. टोलचा करार संपत नाही, तोपर्यंत त्या रस्त्याचे काम होणार नाही. २०२९ पर्यंत त्या रस्त्याला टोल आहे. नंतर एनएचएआय रस्ता हस्तांतरित करून घेईल. मग काम पुढे सरकेल.अहमदनगर पीडब्ल्यूडी कार्यालयाचे मतनवीन ग्रीनफिल्ड अंतर्गत एक्स्प्रेस-वेसाठी भूसंपादनाचे काम मार्च-एप्रिलपर्यंत पुढे सरकले होते. त्यानंतर पुढे काही झालेले नाही. मंजुरी समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पुणे एनएचएआय या रस्त्यासाठी समन्वयक म्हणून काम करीत आहे.

पुणे एनएचएआय कार्यालयाचे म्हणणेएनएचएआय पुणे कार्यालयाचे व्यवस्थापक अभिजित औटे म्हणाले, या रस्त्याचे काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अद्याप याबाबत काहीही निर्णय नाही. स्थानिक एनएचएआय कार्यालयाच्या मते तो रस्ता अहमदनगर आणि पुणे कार्यालयाकडे आहे. त्या रस्त्यावर २०२९ पर्यंत टोल सुरू असेल. बायबॅक तरतुदीनुसार टोलबाबत निर्णय होऊ शकतो. स्थानिक कार्यालयाकडे काहीही माहिती नाही.

अंदाजे किती खर्च?लांबी : २२५ कि.मी.प्रस्तावित रुंदी : ७० मीटर,अंदाजित खर्च : १० हजार कोटीभूसंपादनासाठी : ४ हजार कोटीजिल्ह्यातील लांबी : ४५ कि.मी.अंदाजे : सहापदरी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गPuneपुणे