शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

एका व्यक्तीचा दोनदा मृत्यू!

By admin | Updated: August 3, 2016 00:17 IST

औरंगाबाद : महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी पैशांसाठी काय करतील याचा नेम नाही. एकाच व्यक्तीचे दोन मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे

औरंगाबाद : महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी पैशांसाठी काय करतील याचा नेम नाही. एकाच व्यक्तीचे दोन मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीसाठी हा डाव काही मंडळींनी रचला. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी हा डाव मोडून काढला. दोषींवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले.या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, सातारा परिसरातील शेख अमीर मद्दू पटेल यांचा मृत्यू १९८० मध्ये झाला. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र महापालिकेतून काढले. १९८७ मध्ये परत मनपाने शेख अमीर मद्दू पटेल मरण पावल्याचे प्रमाणपत्र दिले.हे प्रमाणपत्र १९८८ मध्ये देण्यात आले. एका व्यक्तीचे दोन प्रमाणपत्र देताना मनपाने कोणत्याही प्रकारे चौकशी रेकॉर्डची तपासणी केली नाही. नंतर काही वर्षांनंतर शेख अमीर यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचा वाद बराच उफाळून आला.शेख यांच्या मुलांनी दावा केला की, आमच्या वडिलांचे निधन १९८० मध्ये झाले आहे. त्यांनी सातारा भागातील ४ एकर जमीन कोणालाही विकलेली नाही.सय्यद शहानूर सय्यद चाँद यांनी आमच्या वडिलांच्या नावावर दुसरा व्यक्ती उभा करून जमीन नावावर करून घेतल्याचा आरोप केला. या आरोपामुळे जमीन खरेदी करणारे सय्यद शहानूर अस्वस्थ झाले. त्यांनी शेख अमीर जिवंत असताना त्यांच्यासोबत नियमांच्या चौकटीत व्यवहार केला.वास्तविक पाहता अमीर यांचा मृत्यू १९८७ मध्ये झाला. जमीन हडप करण्याच्या उद्देशाने अमीर यांची मुले हा खेळ खेळत असल्याची शंका आली.