ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कार धडकून एक जण ठार; एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:25 IST2025-11-07T18:20:11+5:302025-11-07T18:25:02+5:30

गंगापूर- वैजापूर मार्गावर मांजरी पाटीजवळ झाला अपघात

One killed, one seriously injured after car hits tractor trolley transporting sugarcane | ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कार धडकून एक जण ठार; एक गंभीर

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कार धडकून एक जण ठार; एक गंभीर

गंगापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॉलींच्या ट्रॅक्टरवर पाठीमागून धडकलेल्या कारमधील एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. गंगापूर- वैजापूर मार्गावर मांजरी पाटीजवळ गुरुवारी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नितीन रामा मारनर (वय ३३, रा. कळंभीर, ता. साक्री, जि. धुळे), असे कारमधील मृताचे नाव आहे.

गंगापूरकडून वैजापूरकडे ऊस घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॉलींच्या ट्रॅक्टरला (एमएच १९ पी ४४१२) पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच २० बीएन ४५४५) जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील नितीन रामा मारनर (३३) आणि पंकज आत्माराम बोरसे (४०, दोघेही रा. कळंभीर, ता. साक्री, जि. धुळे) गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी नितीन मारनर यांना तपासून मृत घोषित केले. पंकज बोरसे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title : गन्ने से लदी ट्रैक्टर-ट्रॉली से कार की टक्कर; एक की मौत, एक गंभीर रूप से घायल

Web Summary : मंजरी पाटी के पास गन्ने से लदी ट्रैक्टर-ट्रॉली से एक कार की टक्कर हो गई, जिसमें एक व्यक्ति की मौत हो गई और एक गंभीर रूप से घायल हो गया। मृतक नितिन मारनर को छत्रपति संभाजीनगर के एक अस्पताल में मृत घोषित कर दिया गया। घायल पंकज बोरसे का इलाज चल रहा है।

Web Title : Car hits tractor-trolley carrying sugarcane; one dead, one seriously injured.

Web Summary : A car collided with a sugarcane-laden tractor-trolley near Manjari Pati, resulting in one death and one serious injury. The deceased, Nitin Marner, was declared dead at a hospital in Chhatrapati Sambhajinagar. The injured, Pankaj Borse, is receiving treatment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.