शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 1:23 PM

कार चारी बाजूने चेपली गेल्याने त्यात प्रवासी अडकले

गंगापुर  : गंगापुर - वैजापूर मार्गावरील वरखेड पाटीजवळ कार व व ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.१३ ) पहाटे तीन वाजेदरम्यान हा अपघात झाला. 

नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल येथील सोनवणे कुटुंबीय कारमधून गंगापूरमार्गे अंदरसुलकडे जात असताना वरखेड पाटीजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. ट्रकच्या जोरदार धडकेत कार रस्त्याच्या खाली फेकली गेली. कार सर्व बाजूंनी चेपली गेल्याने  त्यातील प्रवाशी राहुल सोनवणे, शितल सोनवणे, दत्तात्रय सोनवणे आत अडकून गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी १०८ रुग्णवाहिकेस फोन करून बोलावलं. या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती मात्र यातील एकानेही मदत न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. रुग्नवाहिकेतील डॉक्टर लाहोटी चालक प्रवीण भालेराव यांनी अपघातग्रस्त कारमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले व तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान राहुल सोनवणेचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेले शितल सोनवणे, दत्तात्रय सोनवणे या दोघावर प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. 

टॅग्स :Deathमृत्यूcarकारAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद