शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘वन डे मॅरेज’चा धूमधडाका !

By admin | Updated: April 9, 2015 00:14 IST

संजय तिपाले , बीड ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करुन’ ही म्हण प्रसिद्ध आहे. लग्नात सुईपासून ते पंगतीपर्यंतचे नियोजन करताना वधूपित्यांचे काय हाल होतात?

संजय तिपाले , बीड‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करुन’ ही म्हण प्रसिद्ध आहे. लग्नात सुईपासून ते पंगतीपर्यंतचे नियोजन करताना वधूपित्यांचे काय हाल होतात? हे मुलीच्या लग्नावेळीच कळते. आता मात्र, वधू- वरपित्यांचे काम बऱ्याच प्रमाणात हलके झाले आहे. कारण ‘ट्रेंड’आहे (गेटकेन) ‘वनडे मॅरेज’चा! एकदा ‘ठरले’ की साखरपुड्यातच लग्नाचा बार उडविला जातो. पंगतींऐवजी ‘रिसेप्शन’ला पसंती देण्याकडेही कल आहे.मुली- मुलींच्या पसंतीपासून ते ‘बिदाई’पर्यंतच्या साऱ्याच रुढी-परंपरा आता मोडीत निघाल्या आहेत. लग्नसराईचा आता विशिष्ट कालावधीही राहिलेला नाही. सवडीनुसार मुहूर्त काढून लग्नकार्ये उरकले जातात. पूर्वी गरीब असो की श्रीमंत मुलामुलींच्या लग्नात चूलबंद आवतणे देऊन गावपंगत द्यायचे. आता अवाढव्य खर्चाला फाटा देण्यासाठी गेटकेन विवाहाची पद्धती रुढ होऊ पाहत आहे. मोजक्या पाहुण्यांमध्येच लग्नकार्याचा कौतूक सोहळा उरकला जातो. त्यामुळे वधू- वर पित्यांचा वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय वऱ्हाडींसाठीही सोयीचे झाले आहे. लग्नासारख्या मंगल व आनंदी सोहळ्यात प्रतिष्ठा व श्रीमंती मिरविणारे पैशांची अक्षरश: उधळपट्टी करतानाही पहावयास मिळतात. आधुनिकता व वेगळेपण जपण्यासाठी ‘रिसेप्शन’चे लोण ग्रामीण भागांमध्येही पोहोचले आहे. लग्न मोजक्या लोकांमध्ये व रिसेप्शनला आप्तेष्टांना निमंत्रित केले जाते.विवाहसोहळ्याचा मुहूर्त, पत्रिका, स्टेजवरील सजावट, शामियाना, जेवणातील पदार्थ, कपडे, भांडी, बस्ता यात पर्याय उपलब्ध आहेत.लग्नाच्या बदलत्या ‘ट्रेंड’बाबत पुरोहित आनंतराव कुलकर्णी म्हणाले, विवाह सोहळ्याचा मुहूर्त वधू- वर पक्षाच्या सोयीनुसार काढले जातात. ज्यांना झगमगाटात सोहळा करायचा आहे ते रात्रीचा मुहूर्त शोधतात तर वऱ्हाडींची गैरसोय होऊ नये याकरता काहीजण दुपारच्या मुहूर्तावरच लग्नकार्य उरकतात. पूर्वी हळदीसमारंभ चार दिवसांचा असायचा आता गेटकेन लग्नात सकाळी हळद अन् सायंकाळी लग्न असा झटपट कार्यक्रम असतो. नियमित लग्नकार्यात एक दिवसाचा हळदी समारंभ असतो, असे त्यांनी सांगितले.