थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 31, 2022 11:51 IST2022-12-31T11:49:54+5:302022-12-31T11:51:06+5:30

दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे.

On the night before the thirty-first December, the wine shop's wall was broken and liquor worth lakhs was stolen | थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

सेलू (जि.परभणी) : स्टेशन रोडवरील वाईन शाॅपची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी लाखो रूपये किमंतीची विदेशी दारूचे बाॅक्स पळविल्याची घटना शुक्रवारी मध्यराञी घडली. दरम्यान घटना स्थळावर पोलीस दाखल झाले असून श्वास पथकास पाचारण करण्यात आले आहे. 

स्टेशन रोडवर भुतडा यांचे वाईन शाॅप आहे. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंत फोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे. शुक्रवारी मध्यराञी दुकानाची पाठीमागील भिंत फोडून महागडी विदेशी दारूचे बाॅक्स लंपास केले आहेत. शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे दुकान उघडताना व्यवस्थापकास सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेले दिसले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड व कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली आहे. श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

शुक्रवारी आला होता माल
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होते. त्यामुळे शुक्रवारी देशी व विदेशी दारूचा माल आला होता. अज्ञात चोरट्यांनी लाखो रूपये किमंतची विदेशी दारू पळविली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. त्यामुळे चोरटयांना पकडण्याचे आव्हान पोलीसा समोर आहे. संपूर्ण पंचनाम्यानंतर नेकमा किती लाखांचा माल गेला हे कळू शकेल.

Web Title: On the night before the thirty-first December, the wine shop's wall was broken and liquor worth lakhs was stolen