कामगार दिनीच एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे पत्र काढले

By संतोष हिरेमठ | Updated: May 2, 2023 20:00 IST2023-05-02T20:00:09+5:302023-05-02T20:00:49+5:30

कामगारदिनी ही कारवाई करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे होती, असा सूर कर्मचाऱ्यांतून उमटू लागला आहे.

On Labor Day, ST Corporation suspended two employees | कामगार दिनीच एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे पत्र काढले

कामगार दिनीच एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे पत्र काढले

छत्रपती संभाजीनगर : कामगार दिनानिमित्त सोमवारी सर्वत्र कामगारांचा सत्कार होत असताना एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात दोन कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ऐन कामगार दिनाला झालेल्या या कारवाईने एसटी कामगारांनी नाराजी व्यक्त केली. 

मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारातील प्रमुख कारागीर बालाजी तोटवाड आणि प्रमुख कारागीर राजेश बागूल यांना १ मे रोजी निलंबित करण्यात आले. या दोघांच्या निलंबनाच्या आदेशाचे पत्र लगेच सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले. त्यावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त झाला. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. परंतु कामगारदिनी ही कारवाई करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे होती, असा सूर कर्मचाऱ्यांतून उमटू लागला आहे.

 

Web Title: On Labor Day, ST Corporation suspended two employees