ऐन दिवाळीत शासकीय रुग्णालय घाटीत कंत्राटी कर्मचारी संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:55 IST2024-10-31T11:53:46+5:302024-10-31T11:55:30+5:30

वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडत कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

On Diwali, contract employees on strike in government hospital valley | ऐन दिवाळीत शासकीय रुग्णालय घाटीत कंत्राटी कर्मचारी संपावर

ऐन दिवाळीत शासकीय रुग्णालय घाटीत कंत्राटी कर्मचारी संपावर

छत्रपती संभाजीनगर : बोनस देण्याच्या मागणीसाठी घाटीतील कर्मचारी संपावर गेले आहे. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडत कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. संपामुळे रुग्णालयातील सकाळच्या सत्रातील महत्वाची कामे खोळंबली आहेत.

नियमाप्रमाणे बोनस हा कंत्राटी कामगारांचा अधिकार आहे. कंत्राटदाराने बोनस द्यावा, अशी मागणी करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी संप पुकारला. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या. ऐन दिवाळीत कंत्राटी कामगारांच्या संपाने घाटीतील स्वच्छतेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

यावेळी महेंद्र मिसाळ, संदीप ढेपे, संजय दाभाडे, सुरज नितनवरे, राहूल मोरे, विशांत बागूल, अजय बंडाळ, पंकज गौतम, देवा गडकर, आनंद चव्हाण, देवा लाहोट आदी कर्मचारी उपस्थित आहेत.

Web Title: On Diwali, contract employees on strike in government hospital valley