शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती कार्यालय ओस

By admin | Updated: January 12, 2017 00:37 IST

सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांची कामे होत नाहीत.

सिंदेवाही : सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांची कामे होत नाहीत. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने खोळंबत आहे, अशी लाभार्थी नागरिकांमध्ये चर्चा होती. ‘लोकमत’ने स्ट्रिंग आॅपरेशन राबवित सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या.या सर्व प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालय ओस पडल्याचे दिसून आले. येथील पंचायत समितीची स्थापना १९६४ मध्ये झाली. त्याला ५३ वर्षाचा कालावधी होत आहे. सद्यास्थितीत पंचायत समिती कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. सध्या त्या जीर्ण इमारतीत पंचायत समितीचे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयात अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र खोल्यामध्ये बसण्याची व्यवस्था आहे. तसेच शिक्षण विभाग, कृषी विभाग, पंचायत विभाग कार्यालय पंचायत समिती परिसरात वेगवेगळ्या इमारतीमध्ये सुरू आहेत. लोकमत प्रतिनिधीने पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली असता सदर बाब लक्षात आली. या कार्यालयात संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. सध्या प्रभारी संवर्ग विकास अधिकारी म्हणून श्याम बोकडे कार्यरत आहे. पंचायत समिती कार्यालयात कुणीही अधिकारी दिसले नाही म्हणून चौकशी केली असता प्रभारी संवर्ग विाकस अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयातील आस्थापना विभाग ८, पंचायत विभाग २, शिक्षण विभागात ६२ शिक्षक मिळून एकूण ७२ पदे रिक्त आहेत.घरकूल योजना, विहीर बांधकाम, कृषी योजनेचे लाभार्थी व खेडे गावातून कामासाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत राहावे लागते. जनतेचे काम करणारेच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत नसेल तर सामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. (पालक प्रतिनिधी)