शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कार्यालयाला पडला घाणीचा विळखा !

By admin | Updated: January 13, 2015 00:14 IST

सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परीसरता सर्वत्र कचराच कचरा साचला असून बाजुच्या अपार्टमेंटमधील पाणी क्रीडा संकुलात आल्याने घाण पसरत आहे

सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परीसरता सर्वत्र कचराच कचरा साचला असून बाजुच्या अपार्टमेंटमधील पाणी क्रीडा संकुलात आल्याने घाण पसरत आहे. यामुळे दुर्गंधी पसरत असून खेळाडूंना व कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या विविध कारणांनी गाजत आहे. येथे येणाऱ्या खेळाडुंच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला असून याला केवळ येथील अधिकारीच जबाबदार असल्याचा अरोप होत आहे. कारण येथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा परीसर अस्वच्छ आहे. येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे कार्यालयात लक्ष नसल्याने आणि येथील स्वच्छता कर्मचारी व्यवस्थीत काम करीत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.क्रीडा कार्यालयाच्या बाजुलाच एक अपार्टमेंट आहे. येथील रहिवाशी आपल्या घरातील पाणी पाईपद्वारे क्रीडा कार्यालयाच्या परीसरात सोडतात. त्यामुळे येथे चिखल होतो. अनेकवेळा जास्त पाणी आल्यानंतर या पाण्यापासून दुर्गंधी पसरायला लागते. यामुळे खेळाडूंना नाकाला रूमाल लावूनच क्रीडा संकुलाच्या मैदानात प्रवेश करावा लागतो. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ म्हणाल्या, आम्ही अपार्टमेंटमधील लोकांना पाणी सोडू नका असे सांगितले आहे. आता त्यांचे पाईप काढून घेऊ, याउपरही नाही ऐकले तर योग्य ती कारवाई करू. परिसराची स्वच्छता करू, असेही त्यांनी सांगितले.स्वच्छता मोहिमेचा बोजवाराएकीकडे निमशासकीय कार्यालयापासून ते शासकीय कार्यालयांमधील सर्वांनीच हातात झाडू घेत स्वच्छता मोहिम राबविली. परीसर स्वच्छ केला, मात्र येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना याचा विसर पडला आहे. येथील ना अधिकाऱ्यांनी हात झाडू घेतला ना कोणाला घ्यायला सांगितला. त्यामुळे येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच येथील स्वच्छतेबद्दल गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.परीसरातील अस्वच्छेतेला येथील अधिकारी, कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप केला जात असून त्यांचे लक्ष नसल्या कारणानेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.क्रीडा कार्यालयासमोर आणि पे्रक्षागृहाच्या उजव्या बाजुला बॅडमिंटन हॉल आहे. या परीसरातही सर्वत्र घाणच घाण दिसून येते. याच्या पाठीमागे लघुशंका व शौचास बसलेले असतात. यापासून दुर्गंधी पसरत आहे. मोकाट कुत्र्यांचाही वावर येथे असतो.क्रीडा कार्यालयाचा प्रवेशद्वाराजवळील परीसर फक्त स्वच्छ दिसून येतो. ४उजव्या व मागच्या बाजुला तुटलेल्या विटा व कचराच कचरा साचलेला आहे. मागील वर्षभरापासून तरी येथील स्वच्छता केली नसावी, असे येथील कचरा व गवत पाहिल्यावर जाणवते.४बाजुच्या अपार्टमेंटमधील पाणीही कार्यालयाच्या बाजुला व मागच्या बाजुस पडत असल्याने डासांची उत्पत्ती होत असून येथे येणाऱ्या खेळाडूंबरोबरच कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. भिंतीवरही वेली चढली आहे.