मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा

By Admin | Updated: September 2, 2015 23:32 IST2015-09-02T23:32:39+5:302015-09-02T23:32:39+5:30

बीड : मुख्यमंत्री येणार...आपण त्यांचा सत्कार करणार...मागण्यांचे निवेदन त्यांच्यासमोर मांडणार... निवेदने देण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी जमलेल्या जमावाला

The office bearers to meet the Chief Minister | मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आटापिटा


बीड : मुख्यमंत्री येणार...आपण त्यांचा सत्कार करणार...मागण्यांचे निवेदन त्यांच्यासमोर मांडणार... निवेदने देण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त...जिल्हाधिकारी कार्यालय ते शासकीय विश्रामगृह या ५०० मीटर आंतरातील लाईव्ह रिपोर्ट...
दुष्काळी दौरा करून मुख्यमंत्री ७.२० ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. तत्पूर्वी दुपारपासूनच नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी परिसरात गर्दी केली. सायंकाळी सातच्या दरम्यान गर्दीत वाढ झाली. जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय विश्रामगृह परिसरात नागरिकांसह पोलिसांची संख्या अधिक दिसली. प्रत्येकाच्या नजरा नगर रोडच्या दिशेने लागल्या होत्या. ७.१० ला वरूणराजाचे आगमन झाले. तेवढ्यात ट्रायल म्हणून पोलिसांनी आपल्या गाड्यांच्या चार फेऱ्या मारल्या. त्यातून वाहतूक व्यवस्था व सुरक्षेचा आढावा घेतला. वाहतूक शाखेचे पोलीस शिट्ट्या वाजवून वाहतूक सुरळीत करण्यात धावपळ करीत होते. एवढ्यात माजी आ. आदिनाथ नवले यांना विश्रामगृहात जाताना पोलिसांनी अडवले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी बाहेरच थांबणे पसंद केले. मुख्यमंत्री विश्रामगृहात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी गेटसमोर गर्दी केली. यामध्ये काही माजी आमदार व काही पक्षांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पोलिसांशी हुज्जत घालत आत जाण्यासाठी हट्ट धरला. यात पत्रकारही मागे नव्हते. एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने तर मुख्यमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा मी माझ्या जीवाचे काय पण करेल.. त्यानंतर त्या महिलेने विश्रामगृहात प्रवेश केलाच. (प्रतिनिधी)

Web Title: The office bearers to meet the Chief Minister