शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

थॅलेसीमियाग्रस्तांची संख्या सातशेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:27 IST

औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात थॅलेसीमियाग्रस्त रुग्णांची संख्या सातशेच्या घरात गेली आहे. पती-पत्नी मायनर आजाराने ग्रस्त असतील तर जन्मणाऱ्या बालकास थॅलेसीमिया मेजर आजार होण्याचा धोका वाढतो. यासंदर्भात जनजागृतीची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

थॅलेसीमियाविषयी समाजात आजही फारशी जनजागृती नाही. या आजारासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जगभरात दरवर्षी ८ मे रोजी थॅलेसीमिया दिन पाळण्यात येतो. या आजाराचे ‘मेजर’ आणि ‘मायनर’ असे दोन प्रकार आहेत. ‘मायनर’मध्ये आजाराची कोणतीही गंभीर परिस्थिती नसते.

रुग्णाला काही त्रासदेखील होत नाही. त्यामुळे अनेकदा ‘मायनर’ आजाराच्या रुग्णांचे निदानदेखील होत नाही; परंतु पती आणि पत्नी हे दोघेही ‘मायनर’ असल्यास त्यांच्यापासून जन्मणारे बालक हे थॅलेसीमिया मेजर असण्याचा सर्वाधिक धोका असतो. ‘थॅलेसीमिया मेजर’ या प्रकारात रुग्णांत लाल रक्तपेशींची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा बालकांना आयुष्यभर दर पंधरा अथवा दर महिन्याला रक्त देण्याची वेळ येते. त्यामुळे रुग्णांना आधार मिळतो. मात्र, वारंवार रक्त दिल्याने अन्य परिणामांनाही तोंड द्यावे लागते. वारंवार रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. त्यातून हृदय, यकृत आणि इतर अवयवांवर दुष्परिणाम होतो. त्यावर वेगळा उपचार घेण्याची वेळ येते. त्यातून आर्थिक संकटला तोंड द्यावे लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दररोज १० ते १२ रुग्णघाटीत थॅलेसीमियाच्या २५० रुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णांना दर तीन आठवड्याला रक्त द्यावे लागते. त्यासाठी दररोज किमान १० ते १२ रुग्ण येतात. घाटीत थॅलेसीमिया डे केअरदेखील आहे. हा आनुवंशिक आजार आहे. दोन थॅलेसीमिया मायनर लोकांनी विवाह करू नये.-डॉ. प्रभा खैरे, विभागप्रमुख, बालरोग, घाटीसेंटरद्वारे उपचारजिल्हा सामान्य रुग्णालयात सप्टेंबर २०१८ मध्ये डे केअर सेंटर सुरू केले. तेव्हापासून या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. याठिकाणी १४५ रुग्णांची नोंदणी झालेली आहे.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सकलोहाचे प्रमाण वाढतेथॅलेसीमियाच्या रुग्णांचे हिमोग्लोबिन स्थिर राहत नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात साधारण ६५० रुग्ण आहेत. वारंवार रक्त दिल्याने लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदय, यकृतावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज गोळ्या घेण्याची वेळ रुग्णांवर ओढावते.- कैलास औचरमल, अध्यक्ष, औरंगाबाद थॅलेसीमिया सोसायटी

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद