शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

औरंगाबादेत ‘सारी’ रुग्णांची संख्या सव्वादोन हजारांवर; ७५६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:14 PM

शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर सारीने सुरूवातीला थैमान घातले होते.

ठळक मुद्देप्रारंभी सारीच्या रूग्णांचीच संख्या कोरोना रूग्णांच्या तुलनेत अधिक होते. सारी हा संसर्गजन्य आजार नसल्याने त्याचे रूग्णवाढीचे प्रमाण संथ राहिले

औरंगाबाद : कोरोनासोबतच सारी या आजारानेही शहर त्रस्त आहे. या आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्यानेही आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. आजवर औरंगाबादेत आढळलेल्या सारी बाधितांची संख्या आता सव्वादोन हजारांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, सारी बाधितांच्या केलेल्या कोरोना चाचण्यांतून आजवर ७५६ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

शहरात मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर सारीने सुरूवातीला थैमान घातले होते. प्रारंभी सारीच्या रूग्णांचीच संख्या कोरोना रूग्णांच्या तुलनेत अधिक होते. मात्र सारी हा संसर्गजन्य आजार नसल्याने त्याचे रूग्णवाढीचे प्रमाण संथ राहिले, तर कोरोनाने शहराला विळखा घालत गंभीर परिस्थिती मध्यंतरी निर्माण केली होती.  सारीची लक्षणे ही कोरोनासारखीच असल्याने राज्य सरकारने सारी आजारावरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या. त्यानुसार पालिकेने प्रत्येक सारीच्या रूग्णांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक खासगी रूग्णालयांना रोज आढळलेल्या सारीच्या रूग्णांची माहिती कळविण्याची सूचना केली. त्यानुसार नियमित सारीच्या रूग्णांचा अहवाल पालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्‍त होत आहे. अपवाद वगळता आजपर्यंत सातत्याने सारीचे रूग्ण शहरात आढळून येत आहेत. पालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार मंगळवारी शहरात सारीचे नव्याने दोन रूग्ण आढळले. त्यांची कोरोना टेस्ट केली असता दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. आजपर्यंत एकूण बाधितांपैकी १७ जणांना सारी आजारामुळे मृत्यू झाला. आजवर शहरात सारीचे एकूण २,२५३ रूग्ण आढळले. पैकी २,२४४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून आजवर ७५६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर १३९२ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल