शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हायमास्टची संख्या १०० पर्यंत

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक चौकात हायमास्ट लावण्यासाठी चढाओढ सुरू आहे. नगरसेवकांच्या स्पर्धेमुळे अद्यापपर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांचे १०० पेक्षा जास्त हायमास्ट लावले आहेत.

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक चौकात हायमास्ट लावण्यासाठी चढाओढ सुरू आहे. नगरसेवकांच्या स्पर्धेमुळे अद्यापपर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांचे १०० पेक्षा जास्त हायमास्ट लावले आहेत. हायमास्टच्या विजेचे बिल दरमहा लाखो रुपयांमध्ये जात आहे. वाहतुकीचे कोणतेही निकष न पाळता आजपर्यंत हायमास्ट लावण्यात आले आहेत, हे विशेष. शहरात सर्वप्रथम भडकलगेट, मध्यवर्ती बसस्थानक, टी. व्ही. सेंटर चौक, अशा वर्दळीच्या ठिकाणी प्रत्येकी दहा लाख रुपये किमतीचे मोठे उंच हायमास्ट लावण्यात आले. हळूहळू हायमास्टची संख्या वाढत जाऊन ३४ पर्यंत पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत लहान मोठे मिळून आणखी ७० हायमास्ट मनपाच्या विद्युत विभागातर्फे लावण्यात आले. १२ मीटर ते ३० मीटर उंच हायमास्टची किंमतही दोन लाखांपासून दहा लाखांपर्यंत आहे. एका हायमास्टवर किमान सहा मोठे दिवे असून, एक दिवा ४५० व्होल्टचा आहे. हायमास्ट लावण्यासाठी मनपाकडे कोणतेच निकष नाहीत. मागणी केल्यास त्वरित मोठा दिवा लावण्यात येतो. मागील पाच वर्षांमध्ये नगरसेवकांनी नको तेथे दिवे लावले आहेत. आता नवनिर्वाचित नगरसेवकही चौकाचौकांत मोठे हायमास्ट लावण्यासाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. एकीकडे वीज बचतीसाठी प्रशासन शहरात वेगवेगळ्या पद्धतीचे पथदिवे लावत आहे. दुसरीकडे एकानंतर एक हायमास्ट लावल्यास वीज बचतीचा उद्देश सफल होणार नाही. किती वर्दळीच्या ठिकाणी हायमास्ट लावावेत, कोणत्या चौकात हायमास्टची गरज आहे, याची तपासणी करूनच निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे.