शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यात भाविकांची संख्या रोडावली

By admin | Updated: July 29, 2014 01:13 IST

औंढा नागनाथ : येथील आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पेरणीमुळे गर्दी दिसून आली नाही. तरी पहिलाच श्रावण सोमवार असल्याने जवळपास ५० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले.

औंढा नागनाथ : येथील आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पेरणीमुळे गर्दी दिसून आली नाही. तरी पहिलाच श्रावण सोमवार असल्याने जवळपास ५० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले.सोमवारी भाविकांनी हर हर महादेवाच्या जय घोष करीत गर्दी केली होती. रविवारच्या रात्रीपासूनच आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश व इतर राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. रात्री १२.४५ वाजता नागनाथाचा महाभिषेक खा. राजीव सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, तहसीलदार श्याम मदनूरकर, विश्वस्त डॉ. विजय निलावार यांनी केला. नंतर रात्री १ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सभामंडम टाकून त्यात बॅरेकेटस टाकले होते. पावसामुळे भाविक भिजू नयेत म्हणून टीनशेडचे बॅरकेटस बसविल्याने दर्शनासाठी सोयीचे झाले होते. कमी वेळेत दर्शन व्हावे म्हणून संस्थानने नियोजन केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दुपारी २.३० वाजता मंदिरास भेट देवून सुरक्षेचा आढावा घेतला.या ठिकाणी डीवायएसपी नीलेश मोरे, सुनील रसाळ, पोनि ज्ञानोबा पुरी, जमादार शंकर इंगोले, नुरखाँ पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता. सध्या पेरणी सुरू असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली असल्याचे सचिव दिलीप चव्हाण यांनी सांगितले. दिवसभरात केवळ ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. संस्थानच्या स्वयंसेवकास उपसचिव उत्तम देशमुख, विश्वस्त प्रा. साहेबराव देवकते, गणपत बांगर, व्यवस्थापक नीळकंठ देव, शरयू देव यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)महसूल विभागाची बैठक औंढा येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांना विविध सुविधा देण्यासंदर्भात महसूल विभागाने तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता बैठक घेतली.गावामध्ये ठिकठिकाणी खड्डे बुजविणे, वीजपुरवठा सुरळीत करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, आरोग्य सुविधा व औषधी पुरवठा करण्यासंदर्भात सूचना उपविभागीय अधिकार अनुराधा ढालकरी यांनी दिल्या. यावेळी तहसीलदार श्याम मदनूरकर, सचिव दिलीप चव्हाण, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिश दराडे, परिवहन नियंत्रक वामन पवार, तलाठी माणिक रोडगे आदींची उपस्थिती होती.