शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

न.प.कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: September 11, 2014 00:01 IST

वसमत : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

वसमत : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यातील एका कर्मचाऱ्याने बुधवारी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकाराने न. प. वर्तुळात खळबळ उडाली आहे.वसमत न. प. मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सतत अनियमितता असल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्ते, विमा, गृहकर्जावरील व्याजाचा भूर्दंडही बसत आहे.या प्रकाराने त्रस्त झालेल्या हरिश्चंद्र मुंदरे व माधव कुरपटवार या दोन कर्मचाऱ्यांनी बुधवारी न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र ३ महिन्यांपासून थकलेले वेतन अदा करावे, अन्यथा ४ आक्टोबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांनी हे निवेदन बुधवारी सकाळी ११.३० वाजता दिले होते.सायंकाळी चारच्या सुमारास निवेदनकर्त्यांपैकी एक असलेल्या हरिश्चंद्र मुंदरे या कर्मचाऱ्याने न.प. कार्यालयात जावून वेतन मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला व सोबत बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. न.प. कार्यालयातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. सदर कर्मचाऱ्यास उपमुख्याधिकारी मुजीबखान, उपअभियंता रत्नाकर अडसिरे, श्याम माळवटकर यांनी पकडले व त्यास शांत केले. दरम्यान, नगराध्यक्ष भगवान कुदाळे व अन्य सदस्य न.प.मध्ये पोहोचले. त्यांनी चर्चा करून तातडीने कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची सूचना केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान कपात होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता होत असल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)