आता प्रवास होणार आरामात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाल्या ४५ नव्या ‘लालपरी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:12 IST2025-06-10T19:10:23+5:302025-06-10T19:12:07+5:30
छत्रपती संभाजीनगर विभागात ५५२ एसटी बस आहेत. मोठ्या कालावधीनंतर नव्या बसेस येण्यास सुरुवात झाली आहे.

आता प्रवास होणार आरामात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाल्या ४५ नव्या ‘लालपरी’
छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला गेल्या काही दिवसांत ४५ नव्या कोऱ्या ‘लालपरी’ मिळाल्या आहेत. या बसेस विविध मार्गांवर धावत असून, भंगार बसपासून प्रवाशांची काही अंशी सुटका झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात ५५२ एसटी बस आहेत. मोठ्या कालावधीनंतर नव्या बसेस येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत टप्प्याटप्प्यात जिल्ह्यातील ७ आगारांना नव्या लाल बस मिळाल्या आहेत. केवळ सोयगाव आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही. आतापर्यंत ४५ बस मिळाल्या आहेत. आणखी ४५ बस येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी सांगितले. नव्या लाल बसबरोबर काही दिवसांपूर्वीच सिडको बसस्थानकाला २९ ई- बस मिळालेल्या आहेत.
कुठे किती मिळाल्या नव्या लाल बस?
आगार : बसची संख्या
सिडको बसस्थानक : १०
मध्यवर्ती बसस्थानक : ५
पैठण : १०
गंगापूर : ५
वैजापूर : ५
सिल्लोड : ५
कन्नड : ५