शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगरात २ दंड प्रलंबित ठेवणाऱ्याची दुचाकी वाहतूक पोलिस करणार जप्त

By सुमित डोळे | Published: March 12, 2024 12:33 PM

१२२ एनपीआर कॅमेऱ्यांनी दीड महिन्यांत टिपले ३०,६३० बेशिस्त वाहनचालक, सर्वाधिक २१,८८२ ट्रिपल सीट दुचाकीस्वार, ८,२५० राँग साईड

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवर मान वाकडी करत मोबाइलवर बोलणे, सर्रास उलट दिशेने जाणे, एका दुचाकीवर तीन ते चार जण बसणाऱ्या तब्बल ३० हजार ६३० बेशिस्त वाहनचालकांना एनपीआर कॅमेऱ्यांनी कैद केले आहे. गेल्या ४१ दिवसांमध्ये कैद झालेल्या या बेशिस्त वाहनचालकांना २ कोटी ८४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला परंतु ऑनलाईन नोटिसला अद्यापही सकारात्मक प्रतिसाद नसल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. कुठल्याही पकडलेल्या दुचाकीवर दोनपेक्षा अधिक जण दंड आढळल्यास ती उर्वरित दंड भरेपर्यंत जप्त केली जाईल, असे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी स्पष्ट केले.

२६ जानेवारीला स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या ई-चलान प्रणालीला हा प्रयोग जोडण्यात आला आहे. ज्या चौकांमध्ये पोलिस उपस्थित नसतील, कमी प्रमाणात असतील अशा १२२ कॅमेऱ्यांचा या एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्नायझेशन) प्रणालीत समावेश आहे.

एएनपीआर प्रणाली काय आहे ?-ऑटोमॅटिक नंबर रिकग्नायझेशन आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन कॅमेरा, अशा दोन प्रकारच्या प्रणालींचा त्यात समावेश आहे.- पोलिस आयुक्तालय व मनपाच्या स्मार्ट सिटीच्या सीसीसी (कमांड कंट्रोल सेंटर) मध्ये याचे सर्व्हर कार्यरत असेल.-१७ जंक्शन (चौक) वर १२२ अद्ययावत कॅमेऱ्यांद्वारे ही प्रणाली संलग्न आहे.-याद्वारे कॅमेरे सॉफ्टवेअरद्वारे वाहनाची नंबर प्लेट टिपून सर्व्हरला छायाचित्र, वाहनाच्या सर्व माहितीसह पाठवतात.- त्यात प्रामुख्याने विना हेल्मेट, सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपल सीट, राँगसाईड जाणारी वाहने कैद करण्याची कमांड या साॅफ्टवेअरला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर एआयद्वारे हे कॅमेरे अशा वाहनचालकांना कैद करून नंबर प्लेटसह छायाचित्र काढतात. तासाला एका जंक्शनवर ५०० छायाचित्रे निघतात.-वाहनाच्या इत्यंभूत माहितीसह सीसीसीमध्ये छायाचित्र उपलब्ध झाल्यावर शेवटच्या टप्प्यात पोलिस दंडयोग्य वाटल्यास क्लिक करतात. त्यानंतर वाहनचालकाला ३ ते ५ सेकंदांत आरटीओ नोंदणीकृत मोबाइलवर नोटीस प्राप्त होते.

कॅमेऱ्याची १३ मीटरपर्यंत नजर-साऊथ कोरिया कंपनीनिर्मित अद्ययावत तंत्रज्ञयुक्त.-५ मेगापिक्सेल व नाईट व्हिजन कॅमेरे.-कुठल्याही वातावरणात सक्षमपणे कार्यरत.-सिग्नलच्या १३ मीटर अंतरावर कॅमेरे.

२६ जानेवारी ते १० मार्चपर्यंतची आकडेवारी -या प्रणालीद्वारे एकूण ३०,६३० वाहनचालकांना २ कोटी ८४ लाख ८ हजारांचा दंड.-२१ हजार, ८८८ ट्रिपल सीट.-८,३२३ वाहनचालकांनी उलट दिशेने येताना कैद.-१५७ वाहनचालकांनी सिग्नल तोडले.-२६२ वाहनचालक मोबाईलवर बोलताना कैद.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी