शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

आता झाली आठवण नेत्यांना शिवसैनिकांची

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती तुटताच नेत्यांना विशेष करून उमेदवारांना शिवसैनिक, त्यांचे कॅडर आठवू लागले आहे.

औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुती तुटताच नेत्यांना विशेष करून उमेदवारांना शिवसैनिक, त्यांचे कॅडर आठवू लागले आहे. गटप्रमुखांपासून वरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विनवण्या करून प्रचारात आघाडी घ्या, असा सूर आज शिवसेना, भाजपाच्या जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयांत नेत्यांनी, उमेदवारांनी आळवला.कुणाचे नाव पॉम्पलेट, होर्डिंग्जवर नसेल, कुणाला उमेदवाराने फोन केला नाही, तर रुसून बसू नका. उमेदवारांनो कार्यकर्त्यांना रागावू नका, उमेदवारांबाबत कुठेही अपप्रचार करू नका. यासारख्या अनेक टिप्सही यावेळी देण्यात आल्या. उपनेते खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील सर्व विधानसभा उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. शालजोडे, चिमटे आणि विनोदी भाषणांमुळे कार्यालयात संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते. कालपर्यंत युतीमध्ये निवडणुका लढल्या जात असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरजही दुय्यम वाटत असे. मात्र, आता स्वबळावर निवडणूक मैदानात उतरण्याची वेळ आल्यामुळे सर्वांना कार्यकर्ते, कुटुंब, विश्वास या गोष्टी आठवू लागल्या आहेत. मतदारांना बाहेर काढणारी यंत्रणा आता कोलमडली आहे. ती घट्ट करण्यासाठीच कार्यकर्ते हवे असल्याचे शिवसेनेच्या जवळपास सर्वच उमेदवारांच्या लक्षात आल्यामुळे सर्वांनी कार्यकर्त्यांना काम करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या निवडणुका पुढे आहेत. जे शिवसेनेचे काम करणार नाहीत, त्यांच्यावर पक्षाची पाळत असणारच आहे. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असा दमही मेळाव्यात सर्व उमेदवारांनी भावी इच्छुकांना दिला.