शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आता ढोल-ताशांची दुमदुमणार धुमशान!

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

औरंगाबाद : ‘लोकमत’ व ‘श्री गणेश महासंघ उत्सव समिती’तर्फे आयोजित ‘ढोल-ताशा’ स्पर्धेचा दिवस जसाजसा जवळ येत आहे तसा ढोल पथकांचा सराव अधिक तीव्र झाला आहे.

औरंगाबाद : ‘लोकमत’ व ‘श्री गणेश महासंघ उत्सव समिती’तर्फे आयोजित ‘ढोल-ताशा’ स्पर्धेचा दिवस जसाजसा जवळ येत आहे तसा ढोल पथकांचा सराव अधिक तीव्र झाला आहे. गजमुख गजाननाला पारंपरिक वाद्यांच्या निनादात खुश करण्यासाठी गणेश मंडळे सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर ‘ढोल-ताशा’ स्पर्धेच्या निमित्ताने जमणार आहेत. आता बस एक दिवस जाणे बाकी आहे.आतापर्यंत ५० पेक्षा अधिक ढोल पथकांनी नोंदणी केली असून, स्पर्धेच्या नावनोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या लक्षात घेता स्पर्धा खूपच चुरशीची होणार यात काही शंकाच उरली नाही. शहराच्या कुठल्याही भागात गेले असता कोणते ना कोणते ढोल पथक जय्यत तयारी करताना दिसत आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण ढोल आणि ताशावर मेहनत घेत आहेत. त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मित्रमंडळीसुद्धा आपले पथकांना साथ देत आहेत.विशेष बाब म्हणजे केवळ शहरातीलच नव्हे, तर इतर शहरांतील ढोल पथकांनीसुद्धा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पुणे- मुंबई- नाशिकच्या प्रसिद्ध मंडळांनी स्पर्धेत उतरण्यासंबंधी चौकशी केली आहे. त्यामुळे स्पर्धेला आता ग्रँडस्वरूप प्राप्त झाले आहे. मंडळांद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सामाजिक संदेशांवर या स्पर्धेत विशेष भर दिला जाणार आहे. ताल, लय आणि ठेक्याबरोबरच पथकांचा गणवेश, शिस्त आणि समन्वय यांचासुद्धा स्पर्धेच्या वेळी विचार करण्यात येणार आहे. या उत्साहाने साजरा करण्यासाठी ‘ढोल-ताशा’ स्पर्धेत सामील व्हा आणि नागरिकांनीसुद्धा कधी न अनुभवलेल्या जंगी महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता जि.प. मैदानावर हजर राहावे.रोख बक्षिसेस्पर्धेत सहभागी संघांना आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.प्रथम बक्षीस : २५ हजार रुपयेद्वितीय बक्षीस : १५ हजार रुपयेतृतीय बक्षीस : १० हजार रुपयेसहभागी होणाऱ्या प्रत्येक पथकास सहभागी प्रमाणपत्र मिळणार.ढोल-ताशा स्पर्धादिनांक : २१ सप्टेंबर, २०१५वेळ : सकाळी ११ वाजतास्थान : जि.प. मैदान, औरंगपुरा, औरंगाबाद.स्वरूप : प्रत्येक ढोल पथकास १५ मिनिटांचा वेळ दिला जाईलनोंदणीची अंतिम तारीख : २० सप्टेंबर, २०१५संपर्क: ९०२८३५५५५५, ९७६४९९७२०५, ९८२३१७७०८४ गेल्या दोन महिन्यांपासून कसून सराव करणाऱ्या ढोल पथकांना आता साऱ्या शहरासमोर आपली कला सादर करण्याची संधी ‘ढोल-ताशा’ स्पर्धेच्या निमित्ताने चालून आलेली आहे. ‘डीजे’ धांगडधिंग्यापेक्षा पारंपरिक वाद्यांचा लयबद्ध ठेका काय असतो हे या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांना कळेल. त्यामुळे शहरातील सर्व ढोल पथकांनी त्यांच्या उत्साह द्विगुणित करण्यासाठी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदवावा. -संजय बारवाल, अध्यक्ष