शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

धान्यापाठोपाठ आता फळ भाजीपाला अडतही बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:10 IST

औरंगाबाद : शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल करावी, या राज्य शासनाच्या आदेशाला विरोध करून धान्याच्या अडत व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला.

औरंगाबाद : शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल करावी, या राज्य शासनाच्या आदेशाला विरोध करून धान्याच्या अडत व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला. आता या आंदोलनात फळभाजीच्या अडत व्यापाऱ्यांनी उडी घेतली असून, उद्या रविवार १० जुलैपासून फळभाजीपाल्याचा अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्याचा अडत व्यवहार शनिवारी दिवसभर बंद होतो. एक, तीन, चार व पाच सेल हॉलचे कुलूप उघडण्यात आले नाही. त्यामुळे अडतच नव्हे तर किराणा व्यापारही ठप्प झाला होता. सकाळी चिकलठाणा, आडगाव व जडगाव येथील ३ शेतकऱ्यांनी २० क्विंटल गहू, ज्वारी व बाजरी विक्रीसाठी येथे आणली होती. अडत व्यापाऱ्यांनी धान्य उतरून घेतले, पण बंदमुळे हर्राशी झाली नाही. धान्य बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून ३ टक्के अडत घेतली जात होती व फळेभाजीपाला अडत व्यवहारात ६ टक्के अडत घेतली जात होती. अडत शेतकऱ्यांकडून नव्हे तर खरेदीदारांकडून घ्यावी, या अध्यादेशाची प्रत बाजार समितीकडून फळेभाजीपाला अडत व्यापाऱ्यांना आज प्राप्त झाली. यानंतर येथील फळभाजीपालाच्या अडत व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. यावेळी राज्य सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला. रविवारपासून बेमुदत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.व्यापाऱ्यांनी एक प्रत कृउबाच्या सचिवांना देण्यात आली. अडत शेतकऱ्यांकडून घ्यायची नाही आणि खरेदीदार अडत देण्यास तयार नाहीत, मग आम्ही अडत कोणाकडून घ्यायची, असा प्रश्न उपस्थित करून औरंगाबाद फळे व भाजीपाला अडत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष इसा खान यांनी सांगितले की, घोडेगाव, नगर, नाशिक येथील अडत बाजार बेमुदत बंद ठेवला आहे. आम्हीही रविवारपासून आमचे अडत व्यवहार बंद ठेवणार आहोत. अडत व्यापाऱ्यांच्या या बैठकीत अर्जुन येवले, शेख इम्रान, पूंजाराम सराटे, बाबू पैलवान, प्रभाकर पवार, इलियास शेठ यांच्यासह ६५ अडत व्यापारी सहभागी झाले होते.