शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

औंढा नागनाथ तालुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना नोटिसा

By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST

हिंगोली : शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणांचे वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ तालुुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी कारणे

हिंगोली : शेतकऱ्यांना वेळेवर खत व बियाणांचे वितरण केले जात नसल्याच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ तालुुक्यातील १५ कृषी केंद्र चालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या कृषी अधिकारी तथा गुणवत्ता निरीक्षकांनी तालुक्यातील कृषी केंद्र चालकांची तपासणी केली. शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीवरून केलेल्या या तपासणीत १५ कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर व नियमितपणे पुरवठा केले नसल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांना दिला. त्यानंतर नाब्दे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी येथील साई कृषी केंद्र, पोटा खुर्द येथील गणेश कृषी केंद्र, लांडाळा येथील गजानन कृषी केंद्र, शिरड येथील वैभव कृषी केंद्र, कंदी कृषी केंद्र, औंढा येथील सिद्धनाथ कृषी केंद्र, श्री सत्यम ट्रेडर्स, नम्रता कृषी केंद्र, जवळा बाजार येथील बालाजी ट्रेडिंग, रोकडेश्वर कृषी केंद्र, नागेश्वर कृषी केंद्र, अथर्व अ‍ॅग्रो एजंसी, अनखळी येथील माऊली कृपा कृषी केंद्र, वडचूना येथील माऊली कृपा कृषी केंद्र आणि तपोवन येथील गणेश कृषी केंद्र यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
त्यामध्ये रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ च्या कलम ३ नुसार, किटकनाशके अधिनियम १९६८ च्या कलम २ नुसार व बियाणे अधिनियम १९६८ नुसार आपला कृषी निविष्ठा विक्री परवाना का निलंबित करण्यात येऊ नये, याबाबतचा खुलासा दोन दिवसांत लेखी स्वरूपात करण्यात यावा अन्यथा दुकानांचा परवाना निलंबित केल्या जाईल, असाही इशारा या नोटिसीद्वारे नाब्दे यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)