शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठाची सीईओंना नोटीस

By admin | Updated: March 6, 2015 00:33 IST

औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे.

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील वडगाव-टोकी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूर करताना नियमांना बगल देण्यात आल्याप्रकरणी दाखल याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे.१७ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, अनुसूचित जाती, जमातीचे व्यक्ती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींकरिता पात्र ठरविण्यात आलेले आहेत. गंगापूर तालुक्यातील वडगाव-टोकी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या २ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या ग्रामसभेने सदर योजनेसाठी लाभार्थ्यांची नावे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गंगापूर यांच्याकडे पाठविली. तसेच २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन नवीन लाभार्थ्यांची दुसरी यादी तयार करून ती गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी ३९ व्यक्तींच्या वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता देताना शासनाने घालून दिलेल्या निकषाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब लक्षात येताच याचिकाकर्ता गणेश बोराडे यांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली. ज्या व्यक्तींना विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, ते बागायतदार असल्याचे आणि ज्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा लोकांचा त्यात समावेश करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून सुनावणी तीन आठवड्यांनंतर ठेवली.