शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

अनेक विषयाचा अभ्यासक्रमच नाही

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

शंकरनगर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचे १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे़ पण अद्यापही काही वर्गाच्या विषयांचा अभ्यासक्रम नेटवर टाकण्यात आला नाही़

शंकरनगर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचे १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे़ पण अद्यापही काही वर्गाच्या विषयांचा अभ्यासक्रम नेटवर टाकण्यात आला नाही़ गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अनेकानेक प्रयोग सुरू आहेत़ पूर्वी १०० गुणांचा पॅटर्न होता़ तो बदलून ८० लेखी व २० प्रात्यक्षिक असा करण्यात आला़ त्यानंतर सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात आली़ यात ४० लेखी, १० प्रात्यक्षिक असे गुण ठरविण्यात आले होते़ हा सेमिस्टर पॅटर्न सुरळीतपणे सुरू असताना अचानक राज्य लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बहुपर्यायी प्रश्नोत्तर पद्धती सुरू करण्यात आली़ हा पॅटर्नही आता अमान्य होवू लागला असून ३०+१०+१० चा नवीन पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा आहे़विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू झाले आहे़ जुलै महिना उजाडला़ महाविद्यालयांनी अध्यापकांना तासिका घेण्याचे आदेश दिले़ परंतु द्वितीय वर्षाच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अद्याप नेटवर आला नाही़ पुस्तके तर दूरच, त्यामुळे शैक्षणिक कार्य खोळंबले आहे़ स्वत: कुलगुरूंनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)दर पाच वर्षांनी सर्व शाखांचा अभ्यासक्रम बदलला जातो़ गतवर्षी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम बदलला आहे़ नैसर्गिक वाढीप्रमाणे यावर्षी सर्व शाखांचा द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलत आहे़ अभ्यास मंडळ पदाधिकाऱ्यांनी नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नेटवर टाकणे आवश्यक आहे़ जेणेकरून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेवर उपलब्ध होवून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होईल़