शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

दर तीन महिन्याला बिले मिळेनात, हजारोंची बिले एकदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, या ग्राहकांना दर तीन महिन्याला बिले दिली जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे; परंतु कृषिपंप ग्राहकांना वर्षानुवर्षे वीजबिलेच मिळत नाहीत. तसेच बिल जेव्हा येते, त्यावेळी हाती पैसे नसतात. त्यामुळे थकबाकी वाढत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये नवीन कृषिपंप वीज धोरण जाहीर झाले. या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर औरंगाबाद परिमंडळात १ मार्चपर्यंत ४२ हजार २६३ शेतकऱ्यांनी २१ कोटी ९५ लाखांचा भरणा केला आहे. यासंदर्भात शेतकरी लक्ष्मण चंदेल (शिल्लेगाव) म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी पाऊस नव्हता. त्यामुळे विहिरीला पाणी नव्हते, तरीही वीजबिल आले. सचिन वाल्मीकराव शेलार (शहाजतपूर) म्हणाले, कोरोना काळात शेतकरी हातघाईस आले असून, वीजबिल माफ केले पाहिजे. विजेचा वापर कमी होत असताना बिले मात्र जास्तीची येत आहेत, ही मोठी अडचण आहे.

तालुकानिहाय कृषिपंपचालक

औरंगाबाद - २८,८०७

गंगापूर - २७,९०६

कन्नड - ३१,४९१

खुलताबाद - ११,३०६

पैठण - ३१,४४६

फुलंब्री - १९,१७१

सिल्लोड - २७,७४०

सोयगाव - ९,३०७

वैजापूर - ३९,९४९

---

जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २,२७,१२३

वीजबिल थकबाकी - २,६७२ कोटी

----------

कृषिपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल दिले जाते. शिवाय मोबाईवरही बिल कळवले जाते. ज्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी केली नसेल, त्यांना माहिती मिळत नसेल. नियमितपणे वीजबिलाचे वितरण केले जाते.

- संजय अकोडे, अधीक्षक अभियंता, (ग्रामीण) महावितरण

-------

मी चार वर्षांपूर्वी कृषी संजीवनी योजनेत जुने थकीत बिल भरले व बेबाकी करून विहिरीवर विद्युत मीटर बसवला; परंतु चार वर्षांत एकदाही मीटर रिडींग न घेता, मला ६३ हजारांचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे, माझ्या मीटरमध्ये आज रोजी ९ हजार ७४१ युनिट असताना ३६ हजार ५३० युनिटचे बिल पाठवले आहे.

- एस. लक्ष्मण, लाडसावंगी

---

महावितरण कंपनी तीन ते चार वर्षांत एकदा वसुलीसाठी येते. ज्याचे लाख-दोन लाख बिल थकले, त्याच्याकडून पाच हजार रुपये व ज्याचे दहा ते वीस हजारांचे बिल थकले, त्याच्याकडूनही पाच हजार रुपयेच वसूल केले जातात.

- राजेंद्र डवणे, सय्यदपूर

------

ज्यावेळेस पैसे असतात, त्यावेळी बिल येत नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, त्यावेळी वीजबिल येते. विजेसंदर्भात असलेल्या अडचणीही सोडवल्या जात नाहीत. महावितरणने वाढीव बिलाची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

- रामेश्वर निघोटे, हडस पिंपळगाव