शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सहाशे विहिरींना नियमबाह्य मंजुरी!

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : फुलंब्री पंचायत समितीने शासनाच्या विविध योजनांचा निधी पाणीपुरवठा विभागात वर्ग केल्याचे खळबळजनक प्रकरण ताजे असताना नियमबाह्यपणे तब्बल

औरंगाबाद : फुलंब्री पंचायत समितीने शासनाच्या विविध योजनांचा निधी पाणीपुरवठा विभागात वर्ग केल्याचे खळबळजनक प्रकरण ताजे असताना नियमबाह्यपणे तब्बल सहाशे विहिरींना मंजुरी दिल्याचे उघडकीस आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या विहीर वाटपात प्रचंड अनियमितता करण्यात आली आहे.ग्रामीण भागात सर्वसामान्य गरीब नागरिकांना हक्काचे काम मिळावे, सिंचन सुविधेसाठी ‘एमआयईजीएस’ मध्ये वैयक्तिक विहिरींसाठी अनुदान देण्यात येते. एका विहिरीसाठी तब्बल अडीच लाख रुपये अनुदान दिल्या जाते.फुलंब्री पंचायत समितीने २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी तब्बल सहाशे विहिरींना परस्पर मंजुरी दिली आहे. मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या विहिरींसाठी तब्बल ८० लाख रुपयांचे अनुदानही अलीकडेच वाटप करण्यात आले. या सर्व कारभारात शासनाने ठरवून दिलेले निकष मात्र, पायदळी तुडविण्यात आले आहेत.वैयक्तिक लाभाच्या विहिरी मंजूर करताना पंचायत समिती कार्यालयाने लाभार्थी निवडण्यासाठी चक्क दलाल नेमले होते. त्यांनी शोधून आणलेले लाभार्थी पंचायत समिती कार्यालयाच्या दृष्टीने योग्य असल्याचा ‘निर्वाळा’ वरिष्ठ अधिकारी देत होते. विहीर मंजुरीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे आला पाहिजे. अनेक ग्रामपंचायतींना तर आपल्या गावाला किती विहिरी मंजूर झाल्या आहेत याची कोणतीही माहिती नाही. विशेष बाब म्हणजे विहिरी मंजुरीसाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक असते. फुलंब्री पंचायत समितीने एकाही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता विहिरींना मंजुरी दिली.एमआयई- जीएसमध्ये पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड आदी तालुक्यांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार आदी कारणांमुळे चौकशा सुरू आहेत. काही ठिकाणी तर गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत. एवढे सर्व होत असतानाही जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोस कोणतेही पाऊल उचलले नाही.फुलंब्री पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजनेतील कामांचे मूल्यमापन करण्यासाठी तांत्रिक अधिकारी नाहीत. त्यामुळे दैनिक वेतनावर काम करणारे कर्मचारीच सर्व कामे करतात. कार्यालयात आवक-जावक रजिस्टर नाही. एम. बी. चे रेकॉर्ड नाही. कार्यालयातील अभिलेखे कोणालाही सापडत नाहीत. सर्व अभिलेखे पंचायत समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या औरंगाबादेतील निवासस्थानात ठेवण्यात आले आहेत.