शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वॉल्व्हो बसच्या तिकीट दरवाढीस मंजुरी

By admin | Updated: July 19, 2014 00:59 IST

गुडेवारांनी केलेल्या १९ कामांच्या चौकशीची शिफारस

सोलापूर : एसएमटीच्या (महानगरपालिका परिवहन उपक्रम) वॉल्व्हो बसच्या तिकीट दरात २५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. १७ जून रोजी तहकूब झालेली सभा महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी झाली. सभेत सभागृह नेते महेश कोठे यांनी प्रभारी परिवहन व्यवस्थापकाकडून वॉल्व्हो बस तिकीट दर वाढीचा प्रस्ताव मांडला. वॉल्व्हो बस तोट्यात चालत असल्याने ३0 टक्के दरवाढ करण्याची त्यांनी मागणी केली होती. सभागृहाने २५ टक्के भाडेवाढला एकमताने मान्यता दिली. तसेच १४00 रुपये भरल्यास महिनाभर वॉल्व्हो किंवा कोणत्याही बसने नागरिकांना शहरात फिरता येईल व १६00 भरल्यास शहराबरोबरच हद्दीबाहेरही फिरता येईल. दिवसाला हेच भाडे १२0 रुपये असेल. तसेच प्रभाग १८ मध्ये विजेचे खांब उभारून दिवाबत्ती करण्यास, विशेष अनुदानातून शहरातील शौचालये, रस्ते करणे, बागांचा विकास करण्याच्या कामाला एकमताने मंजुरी देण्यात आली. तसेच सहयोगनगर ते वसुंधरा कॉलेज, डी फॉर्मसी कॉलेज ते मयूर मंगल कार्यालयापर्यंतचा रस्ता, नगरोत्थानमधील विविध रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. खमितकर अपार्टमेंट ते धुम्मा वस्तीकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्याच्या कामासाठी रेल्वे विभागाच्या कराराप्रमाणे भरावयाच्या रकमेला मंजुरी देण्यात आली. नागेश वल्याळ यांनी याला आक्षेप घेत रेल्वेकडे असलेली पाणी पुरवठ्याची सात वर्षांपासून थकीत असलेली ७ कोटी ८१ लाख थकबाकी वळती करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सभागृह नेते कोठे यांनी जुना कुंभारी रोड, बनशंकरी हॉटेल चौकात पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम आयुक्तांच्या अधिकाऱ्यातून तातडीने घेतले. पण अद्याप हे काम पूर्ण झालेले नसताना आयुक्तांनी हा अधिकार का वापरला, असा सवाल उपस्थित केला. त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपअभियंता विजयकुमार राठोड यांनी नगरोत्थानातील रस्त्यांच्या कामात पाईपलाईन आल्याने हे काम घ्यावे लागले, असा खुलासा केला. त्यावर आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी खास अधिकार वापरून अशी किती कामे केली, असा सवाल केला. त्यावर पाणी पुरवठ्याची १९, ड्रेनेजची २ कामे झाल्याचा प्रशासनाने खुलासा केला. दिलीप कोल्हे, संजय हेमगड्डी यांनी प्राणी संग्रहालयाजवळील जागेला कुंपणाचे काम अशाच पद्धतीने झाल्याचा आरोप केला. आनंद चंदनशिवे यांनी खुलासा करताना नागरिकांची गरज म्हणून गुडेवारांनी कामे केली. प्राणी संग्रहालयाजवळील जागेतून मनपाचे ३00 कोटी वाचले. न्यायालयाच्या आदेशान्वये कुंपणाचे काम केले, असे सांगितले.