शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नमस्कारामुळे आत्मविश्वास वाढतो

By admin | Updated: June 22, 2014 00:42 IST

पळसा : जिल्हा परिषद आपल्या दारी या संकल्पनेतून जि़प़नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे हे दररोज एका खेड्यामध्ये स्वत: मुक्काम करून जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून घेत आहेत़

पळसा : जिल्हा परिषद आपल्या दारी या संकल्पनेतून जि़प़नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे हे दररोज एका खेड्यामध्ये स्वत: मुक्काम करून जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून घेत आहेत़ याच कार्यक्रमांतर्गत पळसा ता़ हदगाव येथे हनुमान मंदिरासमोर ग्रामसभा घेवून शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली़ लक्षवेधी नमस्काराबद्दल बोलताना त्यांनी प्राथमिक शिक्षणापासून मुलांनी आई-वडील, गुरू यांना नमस्कार करावा व सर्व लहान-थोरांना शाळेत जाताना-येताना तसेच ओळखीच्या व अनोळखी व्यक्तींना सुद्धा नमस्कार करण्याचे आवाहन केले व त्याचबरोबर मोठ्या माणसांनी सुद्धा सर्वांना नमस्कार करावा असे आवाहन केले़ नमस्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व पुढे ते कोणासोबत बोलताना संकोच करणार नाहीत व तसेच नितीमुल्यांचे जतन होईल़ संस्कृती टिकेल असे त्यांनी सांगितले़कार्यक्रमास निर्मल भारत, सुवर्ण जयंती, शौचालय इत्यादी विषयी सखोल माहिती गटविकास अधिकारी निलेश घुले यांनी दिली़ तसेच संपूर्ण गाव निर्मल केल्यास गावास २५ लाख रुपये शौचालयासाठी उपलब्ध करून देऊ असे कार्यकारी अभियंता एस़पी़ पैलवाड यांनी सांगितले़ कार्यक्रमास सरपंच कांताबाई मुळे, तालुका आरोग्य अधिकारी पालिकोंडावार, उपअभियंता मुदीराज, शिक्षण विस्तार अधिकारी बाच्चे, गायकवाड, बागल, उपसरपंच उत्तमराव कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिकराव मस्के, सुनील पाटील, विलास मस्के, नरहरी घिरटकर, दत्तराव सुरोशे, भगवान कोथळकर, शिवाजीराव मस्के, गोपाल भाऊ, कोंडबा दवणे, अंगणवाउी कार्यकर्ती, मदतनीस, ग्रामसेवक पांडुरंग श्रीरामवार, शंकर मुळे, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)