शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 20:04 IST

जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम 

औरंगाबाद : आता वरिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग न घेता जूनच्या मध्यापर्यंत ऑफलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. लसीचे दोन डोस बंधनकारक करणारी अट विद्यापीठाने मागे घेतली आहे. त्यामुळे डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा मिळणार आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून उच्चशिक्षण विभागाने १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस सक्तीचे केले होते. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ पासून महाविद्यालये उघडली असली, तरी वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य होती. अनेक विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही. काहींनी लसीचा एक डोस घेतला आहे. दुसऱ्या डोससाठी त्यांना ८४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने वर्ग सुरू केले तरीही महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. अलीकडे काही दिवसांपूर्वी शासनाने कोरोनाबाबतचे पूर्ण निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे विद्यापीठानेही आता वर्गात बसण्यासाठी लसीचे प्रमाणपत्र तपासण्याची अट रद्द केली आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना सुरुवात होणार आहे. जुल्ले अखेरपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. ३१ जुलै ही चालू शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आणि नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन अध्ययन करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासकीय सूत्राने सांगितले.

महाविद्यालयांची कसोटीविद्यापीठाने ४०० महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण (अकॅडेमिक ऑडिट) केले असून त्यापैकी १०० महाविद्यालयांना ‘नो ग्रेड’ मिळाला आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांना यापुढे शासकीय सुविधा मिळणार नाहीत तसेच त्यांना पुढील वर्षासाठी संलग्नीकरणही मिळणार नाही. त्यांनी लवकरात लवकर ‘ग्रेड’साठी आवश्यक पायाभूत सुविधा, संशोधनाबाबतचे कार्य हाती घेण्याची संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा