शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पगारी नाहीत, वसुलीला रोखू नका...

By admin | Updated: February 9, 2016 00:24 IST

उस्मानाबाद : रबी हंगाम २०१४-१५ ची ४६.२५ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे.

उस्मानाबाद : रबी हंगाम २०१४-१५ ची ४६.२५ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून सदर रकमा वर्ग करण्याचे काम सुरू असतानाच बँक कर्मचाऱ्यांनीही वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या नाहीत. त्यामुळे विम्याच्या रकमेतून थकित रकमा वसूल कराव्यात, अशी मागणी केल्याने याप्रकरणी जिल्हा बँक समन्वयाने कसा मार्ग काढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.रबी हंगाम २०१४-१५ साठी जिल्हा बँकेकडे ४६.२५ लाखांची रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रकमेचे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी याद्या करण्याचे कामही बँकेने हाती घेतले आहे. याच अनुषंगाने सोमवारी सर्किट हाऊसवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बँकेतील सत्ताधारी संचालकांची बैठक पार पडली. मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या विमा रकमेतून थकबाकी वसूल करणे योग्य होणार नाही. त्यामुळे पीक विम्यातून कर्जाची रक्कम कपात न करता संबंधित शेतकऱ्यांना रकमा वितरित कराव्यात, असे निर्देश आ. पाटील यांनी या बैठकीत संचालकांना दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष कैैलास शिंदे यांच्यासह सत्ताधारी संचालकांनी आ. पाटील यांच्या या सूचनेला संमती दर्शविली. या बैठकीनंतर बँकेचे अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा बँकेत कार्यकारी संचालकासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विम्याच्या रकमा थकबाकी वसूल न करता शेतकऱ्यांना वितरित करण्याचे निर्देश दिले. मात्र, या निर्णयाला जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मागील सहा महिन्यांपासून पगारी झालेल्या नाहीत. अनेकांकडे वर्षानुवर्षाची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल न झाल्यास बँकेचा परवाना अडचणीत येवून बँक बंद करण्याची नामुष्की येईल. जिल्हा बँकही शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे वसुलीसाठी सहकार्य करून बँक कशी उभी राहील, हे पहावे, असे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संचालकांना सुनावल्याचे समजते. थकबाकी वसुलीचे रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश असल्याचेही या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने पीक विम्याच्या रकमेतून थकित वसुली होणार की जिल्हा बँक रकमा थेट वितरित करणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा बँक संचालकांचीही ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली असून, यातून काय तोडगा निघतो, याकडे आता लक्ष लागले आहे.