शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मोठा निर्णय! छ. संभाजीनगरात आता दुचाकीला २०० तर चारचाकीला फक्त २००० रुपयांचे इंधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:07 IST

इंधन टंचाईच्या अफवेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय; दुचाकी-चारचाकी गाड्यांसाठी इंधन मर्यादा लागू

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे. या अनपेक्षित मागणीमुळे पुरवठ्याचा समतोल बिघडल्याने, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांनी इंधन वितरणावर कडक निर्बंध लादले आहेत. जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.नवे 

नियम: दुचाकीला २००, चारचाकीला २०००प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, आता दुचाकी वाहनांसाठी एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपये, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २००० रुपयांपर्यंतच इंधन भरता येणार आहे. या मर्यादेमुळे पंपांवरील रांगा कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना विनाविलंब प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदीअनेक नागरिक भीतीपोटी कॅन, प्लास्टिक बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन साठवून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाच्या सुट्या भांड्यात इंधन देण्यास सक्त मनाई केली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्याकडील शिल्लक साठा आणि रोजची मागणी याची माहिती फलकावर प्रदर्शित करणे आता बंधनकारक असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पंपचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Restrictions Imposed in Chhatrapati Sambhajinagar Amidst Panic Buying

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces fuel restrictions due to panic buying fueled by rumors. Two-wheelers limited to ₹200, four-wheelers to ₹2000. Loose fuel sales banned. Pumps must display stock; violators face action.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर