अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नितीन सोमाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:06 IST2021-02-23T04:06:26+5:302021-02-23T04:06:26+5:30
संस्थेची वार्षिक निवडणूक दि. २० फेब्रुवारीस पार पडली. श्रीकांत उमरीकर (सचिव), सुधीर बोंडेकर (उपाध्यक्ष), सुधीर शिरडकर (कोषाध्यक्ष), गिरीश ...

अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नितीन सोमाणी
संस्थेची वार्षिक निवडणूक दि. २० फेब्रुवारीस पार पडली. श्रीकांत उमरीकर (सचिव), सुधीर बोंडेकर (उपाध्यक्ष), सुधीर शिरडकर (कोषाध्यक्ष), गिरीश लोया (सहसचिव), डॉ. उत्तम काळवणे (सह कोषाध्यक्ष), मेजर सईदा फिरासत (महिला प्रतिनिधी), मकरंद राजेंद्र (जनसंपर्क अधिकारी) यांचीही नूतन कार्यकारिणीत निवड झाली.
मागील सात वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा उपक्रम, विविध उपक्रमांना चालना, उद्योग जगताशी सुसंवाद हे उपक्रम चालू राहतील, असे मत सोमाणी यांनी व्यक्त केले. माजी अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, शिरीष तांबे, त्रिलोकसिंग जबिंदा यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
प्राचार्य प्राणेश मुरनाळ, अजीत सौंदलगीकर (माजी अध्यक्ष), डॉ. नितीन भस्मे, सुरेश तांदळे, रंगनाथ चव्हाण, आशिष अग्रवाल, रवींद्र गायकवाड, डॉ. संजय शिंदे (प्राध्यापक प्रतिनिधी), प्रा. विवेक क्षीरसागर (प्राध्यापक प्रतिनिधी), सुरेंद्र पाटील, सुमेधा कुरूंदकर बोर्डे, किरण यंबल, चंद्रशेखर पालवणकर, प्रशांत नानकर, अद्वैत कुलकर्णी, अमृत संघई (मुंबई प्रतिनिधी), संदीपान रेड्डी (मुंबई प्रतिनिधी), दीपक माहुरकर (पुणे प्रतिनिधी), अजय शिंदे (पुणे प्रतिनिधी) यांचाही नूतन कार्यकारिणीत समावेश आहे.
प्रा. संतोष आटीपामलू व प्रा. डी. ए. देसाई यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. माजी विद्यार्थी संघटना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यात येणार असल्याचे मकरंद राजेंद्र यांनी सांगितले.
फोटो ओळ :
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेची नूतन कार्यकारिणी.