शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीही स्थगित

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या

औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या नामुष्कीला विद्यापीठ प्रशासनाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सहायक कुलसचिव पदासाठी ४ डिसेंबर रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी होणार असून त्यानंतर मग मुलाखतीचा दिवस ठरविला जाईल. सोमवारी उपकुलसचिव पदासाठी एकही उमेदवार पात्र नसल्याचे छाननी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या आदेशानुसार मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिवपदासाठी मुलाखती आयोजित केल्या. तत्पूर्वी, छाननी समितीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. तेव्हा अनेक उमेदवारांच्या कागदपत्रांद्वारे काही तांत्रिक बाबी समोर आल्या. याचा अर्थ ते उमेदवार अपात्र नव्हते. विद्यापीठ प्रशासनाने सहायक कुलसचिव पदासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये अनेक संदिग्धता होत्या. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज केले होते. संबंधित उमेदवारांचे शैक्षणिक, अनुभव व अन्य प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणीसाठी आज मंगळवारी पुरेसा अवधी नसल्यामुळे छाननी समितीच्या निर्णयानंतर कुलगुरूंनी आजच्या मुलाखती स्थगित केल्या. ४ डिसेंबर रोजी सहायक कुलसचिव पदाच्या उमेदवारांची छाननी समितीसमोर कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर मुलाखतीची तारीख निश्चित केली जाणार आहे. छाननी समितीसमोर हजर झालेल्या खुल्या प्रवर्गातील ४० पेक्षा जास्त व विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील ११ उमेदवारांच्या कागदपत्रांची आज सकाळी तपासणी सुरू झाली. तेव्हा दुसरीकडे कुलसचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव, राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण, शासनाचे प्रतिनिधी डॉ. गुप्ता हे मुलाखत समितीचे सदस्य उमेदवारांच्या प्रतीक्षेत बसले होते. दुपारनंतर त्यांना आजच्या मुलाखती स्थगित केल्याचा निरोप मिळाला. सलग दोन दिवस विद्यापीठात मुलाखतीची संपूर्ण यंत्रणा सज्ज असताना पात्र- अपात्रेवरून अखेर मुलाखती रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. ४मुलाखत समितीचे सदस्य तथा राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याकडे काही सूचना मांडल्या. विद्यापीठाची नामुष्की टाळण्यासाठी यापुढे कोणत्याही भरतीसाठी जाहिरात देताना त्यामध्ये उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी स्पष्ट उल्लेख असावा. ४जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहू नये. यामुळे विद्यापीठाचा वेळ व पैसा वाचेल. बदनामी होणार नाही. शिवाय, उमेदवारांचाही मानसिक त्रास वाचेल.४प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारावर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी आज तीव्र नापसंती व्यक्त केली. यापुढे गांभीर्यपूर्वक काम करण्याच्या सूचना कुलगुरूंनी प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या.