नवा फलक, नवा अभिमान! छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 19:08 IST2026-01-24T19:07:25+5:302026-01-24T19:08:12+5:30

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर नव्या ओळखीचे स्वागत! नामकरणानंतर आता स्वागताचा फलकही झळकला

New sign, new pride! Welcome to Chhatrapati Sambhajinagar Airport! | नवा फलक, नवा अभिमान! छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे!

नवा फलक, नवा अभिमान! छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे!

छत्रपती संभाजीनगर: पर्यटन राजधानी म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या या शहरात येणाऱ्या प्रत्येक विमान प्रवाशाचे स्वागत आता एका नव्या आणि अभिमानास्पद ओळखीने होत आहे. काही दिवसांपूर्वीच विमानतळाचे अधिकृत नामकरण ‘छत्रपती संभाजीनगरविमानतळ’ असे करण्यात आले होते. या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष जमिनीवर दिसू लागली असून, विमानतळावर ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आपले स्वागत आहे,’ असा नवा कोरा स्वागत फलक दिमाखात लावण्यात आला आहे.

केवळ नावाचा बदल कागदोपत्री न राहता, आता विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते आतमध्ये ठिकठिकाणी नवीन फलक लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विमानतळावर नव्या नावाचा हा फलक झळकल्याने शहराची नवी ओळख अधिक दृढ आणि स्पष्ट झाली आहे.

विमानतळावर बदलले चित्र
यापूर्वी हा विमानतळ ‘औरंगाबाद’ या नावाने ओळखला जात होता. मात्र, आता विमानतळ परिसरात ठिकठिकाणी ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव अधिकृतपणे झळकू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना आता विमानतळावर पाऊल ठेवल्यापासूनच शहराच्या नव्या इतिहासाची आणि अस्मितेची जाणीव होणार आहे.

Web Title : नया संकेत, नया गौरव: छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे पर स्वागत!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे ने गर्व से अपने नए साइनेज का अनावरण किया, जो शहर की नई पहचान को आधिकारिक रूप से अपनाने में एक महत्वपूर्ण कदम है। हवाई अड्डा, जो पहले औरंगाबाद था, अब क्षेत्र की विरासत को दर्शाता है, यात्रियों का स्वागत स्थानीय गौरव और ऐतिहासिक जागरूकता की एक नई भावना के साथ करता है।

Web Title : New Sign, New Pride: Chhatrapati Sambhajinagar Airport Welcomes All!

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar Airport proudly unveils its new signage, marking a significant step in officially adopting the city's new identity. The airport, formerly Aurangabad, now reflects the region's heritage, welcoming travelers with a renewed sense of local pride and historical awareness.