शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगवी बंधाऱ्यास बसणार नवे दरवाजे

By admin | Updated: December 18, 2015 00:01 IST

नांदेड : आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्याचे संपूर्ण २० दरवाजे बदलून त्याठिकाणी नवीन लोखंडी दरवाजे बसविण्यात येणार आहेत़

नांदेड : आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्याचे संपूर्ण २० दरवाजे बदलून त्याठिकाणी नवीन लोखंडी दरवाजे बसविण्यात येणार आहेत़ दरम्यान, हा बंधारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ मागील आठवड्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगवी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे एक गेट तुटले होते़ त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले़ मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने नवीन दरवाजा बसविला़ या घटनेनंतर बंधाऱ्याच्या हस्तांतरणाचा विषय चर्चेत आला़ पाणी सोडण्यापूर्वी या बंधाऱ्याची दुरूस्ती करणे आवश्यक होते़ महापालिकेला हा बंधारा हस्तांतर झाला नव्हता़ त्यामुळे दुरूस्ती कोणी करायची हा घोळ सुरू होता़ यापूर्वी अनेकदा महापालिकेने कोल्हापुरी बंधारा हस्तांतरणासाठी पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते़ मात्र या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली़ यासंदर्भात ‘लोकमत’ने बंधारा हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते़ त्यानंतर पाटबंधारे विभागाने हा बंधारा महापालिकेला हस्तांतरण करण्याची प्रकिया सुरू केली़ यासंदर्भात मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले, पाटबंधारे विभागाकडून हा बंधारा महापालिकेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ हा बंधारा दुरूस्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलले असून संपूर्ण २० दरवाजे नवीन बसविण्यात येणार आहेत़ दरवाजे तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे़ सांगवी बंधाऱ्यातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेतंर्गत शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ हे पाणी कमी झाल्यानंतरच दरवाजे बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे़ पाणीपाळी नुसार पुन्हा उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येईल़ वर्षभरात २४० दिवस पाणी सोडण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)