शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बोर्ड बसविणे सुरू

By admin | Updated: December 23, 2015 00:10 IST

वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन अखेर महावितरण प्रशासनाने सिडको वाळूज महानगरातील कालबाह्य झालेल्या वीजतारा व बोर्ड दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

वाळूज महानगर : लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन अखेर महावितरण प्रशासनाने सिडको वाळूज महानगरातील कालबाह्य झालेल्या वीजतारा व बोर्ड दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मंगळवारपासून साईनगर भागात नवीन विद्युत बोर्ड बसविण्याचे काम सुुरू करण्यात आले आहे. सिडको वाळूज महानगरातील लघु व मध्यम भागातील वीजतारा व बोर्ड जीर्ण झाल्याने नागरिकांना कायम विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. जुन्या वीजतारा व केबल वायर असल्याने कुजून आपोआप अनेक ठिकाणी तुटत आहेत. घरालगत असलेल्या बोर्डची अवस्था तर फारच दयनीय झाली आहे. मुले रस्त्यावर खेळत असल्याने व नागरिकांची ये-जा सुरू असल्याने या भागात शॉक लागून एखादी दुर्दैवी घटना घडण्याचा धोका आहे. यासंदर्भात साईबाबा मित्रमंडळाचे दत्तात्रय वर्पे व आम आदमीचे प्रकाश जाधव यांनी २ आॅक्टोबर रोजी सिडकोतील महावितरण कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी महावितरण प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांना महिनाभरात काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. काम मंजूर असतानाही महावितरण प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित करून महावितरण प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणला. वृत्ताची दखल घेऊन अखेर हे काम महावितरणने हाती घेतले आहे. मंगळवारी साईनगर भागापासून नवीन विद्युत बोर्ड व केबल वायर बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या भागात जवळपास ५४ नवीन विद्युत बॉक्स बसविण्यात येणार असून त्यानंतर केबल वायर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.