शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बायपास भूसंपादनाला तूर्तास नकार

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : दोन वर्षांपासून भिजत पडलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून भिजत पडलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. बायपासचा भाग वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागात भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने आजच्या बैठकीत दाखविली. त्यानुसार वाळूज येथील एएस क्लबपासून पुढे कन्नड औट्रम घाटापर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लगेचच भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी औरंगाबाद वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र, या प्रक्रियेला अद्याप सुरुवातही झालेली नाही. दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. औरंगाबाद शहरातून जात असलेला हा महामार्ग शहराबाहेरून नेण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा परिसरातून बायपास प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, हा बायपास आणखी दुरून म्हणजे बिडकीन परिसरातून नेण्याची सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केली होती. त्याच कारणावरून गेल्या वर्षापासून ही प्रक्रिया रखडली होती.हायवे अ‍ॅथॉरिटीने वाल्मी वगळता इतर सर्व म्हणजे मनपा, सिडको, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविले. वाल्मीने मात्र जागा देण्यास अजून मंजुरी दिलेली नाही. या सर्व कारणांमुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर सातत्याने टीका होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज या विषयावर बैठक घेतली.बैठकीला नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीचे प्रकल्प संचालक यू. व्ही. चामरगोरे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांची उपस्थिती होती. वाल्मीच्या जागेबाबत ठोस निर्णय झाल्यानंतर बायपाससाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाईल, त्यामुळे तूर्तास एएस क्लबपासून पुढे औट्रम घाटापर्यंत भूसंपादन होईल.काम रखडल्यामुळे खर्चात वाढसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचा बायपास ५२ किलोमीटरचा असणार आहे. त्यासाठी ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, काम रखडल्यामुळे गेल्या वर्षात या कामाची किंमत बरीच वाढली आहे. अजूनही या बायपासच्या भूसंपादनाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या कामाच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.