शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

जवळगावकरांचा ‘गड’ कठीणच !

By admin | Updated: June 13, 2014 00:37 IST

सुनील चौरे , हदगाव हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांमुळे काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना विधानसभेचा गड यंदा कठीणच असल्याचे दिसते.

सुनील चौरे , हदगावहदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे असलेले आव्हान, इतर तुल्यबळ उमेदवारांमुळे काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना विधानसभेचा गड यंदा कठीणच असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसते.काँग्रेसचा आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेले २२०० मताधिक्य सध्या येथे चर्चेचा विषय बनले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांनी निवडणूक लढविली. सातव यांना मताधिक्य देण्यात आ. जवळगावकर कमी पडले. विशेष म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. जवळगावकर हे जवळपास ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होेते. ही जादू लोकसभा निवडणुकीत दिसून आली नाही. परिणामी केंद्रात बदललेली सत्ता आणि विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी आमदारांची तसेच काँग्रेस पक्षाची तुटलेली नाळ चर्चेत आहे. दुसऱ्या बाजुला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंग झटकून आतापासूनच कामाला सुरुवात केली तर त्याचा पक्षाला लाभ मिळू शकतो, अशीही शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे.काँग्रेस आमदाराची पाच वर्षांची कामगिरी चांगली आहे. रस्ते, सिंचन, पाणी योजना यासाठी लागणारा आवश्यक निधी मतदारसंघात खेचून आणण्यात यश आले. हदगाव शहरवासियांना फिल्टरचे पाणी देतो म्हणून आमदारांच्या नेतृत्वाखाली पालिकेची सत्ता काबीज केली. हा प्रकल्प मात्र अद्यापही पूर्ण झाला नाही. शिवसेनेने या मतदारसंघात २००९ पूर्वी सलग १५ वर्ष सत्ता उपभोगली. २००९ मध्ये मात्र काँग्रेसला यश मिळाले. तेव्हा जवळगाकर यांची पाटी कोरी होती. २०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव नागेश पाटील आष्टीकर रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यांचीही पाटी कोरी आहे. त्यांना साथ मिळेल ती माजी आमदार व खासदार सुभाष वानखेडे यांची. बापूराव पाटील आष्टीेकर सलग दहा वर्षे आमदार होते. तेही येथे विसरता येणार नाही. हदगाव तालुक्याचे राजकारण आतापर्यतच्या इतिहासात तीन-चार घरांतच फिरले आहे. आष्टीकर, सूर्यकांता पाटील, बाबूराव पाथरडकर, वानखेडे व माधवराव पाटील जवळगावकर. या मतदारसंघात जेव्हा-जेव्हा इतर मागास उमेदवार जड झाला तेव्हा-तेव्हा सर्व पाटलांनी एकत्र येत त्याला पाडण्याचे काम केले. १९९५ मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले. यंदाच्या निवडणुकीत जवळगावकर यांच्यासह आष्टीकर, राष्ट्रवादीच्या माजीमंत्री सूर्यकांता पाटील या रिंगणात उतरण्याची चिन्हे, मनसेचे सुरेश सारडा यांनीही तयारी चालविली आहे.सूर्यकांता पाटील यांची कारकिर्द पाहता त्या विजयी होतील की नाही, हे सांगणे कठीण आहे. परंतु कोणाला निवडून आणायचे हे त्या ठरवू शकतात. विधानपरिषदेचा त्यांचा पत्ताही कटला आहे़ त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी त्या सर्व शक्ती पणाला लावणार हेही तेवढेच खरे़ २००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेशिवसेनाबाबूराव पाथ्रडकर ५१८०३अपक्ष सुरेश जाधव २१३७ काँग्रेस माधवराव जवळगावकर ९६५८४इच्छुकांचे नाव पक्षमाधव जवळगावकर काँग्रेस नागेश आष्टीकर शिवसेनासूर्यकांता पाटील अपक्षसुरेश सारडा मनसे