नेहाबाई शिंदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:36+5:302021-02-05T04:10:36+5:30
फोटो क्रमांक- नेहाबाई शिंदे ----------------------------- नाना-नानी पार्क फलकाचे अनावरण वाळूज महानगर : बजाजनगरात स्व.के.व्ही.हिंगणकर नाना-नानी पार्कच्या फलकाचे अनावरण रविवारी ...

नेहाबाई शिंदे यांचे निधन
फोटो क्रमांक- नेहाबाई शिंदे
-----------------------------
नाना-नानी पार्क फलकाचे अनावरण
वाळूज महानगर : बजाजनगरात स्व.के.व्ही.हिंगणकर नाना-नानी पार्कच्या फलकाचे अनावरण रविवारी करण्यात आले. आचार्य द्रोण क्रीडा मंडळ संचलित व सामाजिक विचार मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रेखा हिंगणकर, संगीता पाटील, संतोष निंबुळकर, गजानन नांदूरकर उपस्थित होते.
---------------------------------
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
वाळूज महानगर : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून वाळूजच्या १९ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलोफर आयाज शेख (रा.वाळूज) या विवाहितेस २ लाखांसाठी तिच्या सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला होता. सततच्या छळाला कंटाळून निलोफर शहा हिने वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
ऑटो क्लस्टर रस्त्यावर खड्डे
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व कामगारांना खड्डे चुकवतच ये-जा करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघातही घडत असल्याची ओरड कामगार व वाहनधारकांतून केली जात आहे.
--------------------------
सिडको महानगरातून मुलगी बेपत्ता
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ही मुलगी शनिवारी सकाळी १०.३० वाजता मी बाहेरून जाऊन येते, असे म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र, परत न आल्याने मुलीच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------