शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर

By राम शिनगारे | Updated: October 21, 2024 19:18 IST

महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही.

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्वच पणाला लागले आहे. महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही. त्यातच विधान परिषदेचे आ. सतीश चव्हाण यांचे पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबन झाले. शिक्षक आ. विक्रम काळे धाराशिव जिल्ह्यातील कळंब विधानसभेची तयारी करीत आहेत. त्यामुळे पक्षाला जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी उरला नसल्याने अस्तित्वच धोक्यात आले आहे.

भाजपने पहिल्या यादीत जिल्ह्यातील तीन विद्यमान जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन आणि सहा विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आणि भाजपचे तीन उमेदवार विजय झाले होते. शिवसेनेनेत फूट पडल्यानंतर पाच आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंना साथ दिली, तर एक आमदार ठाकरेंसोबत राहिला. महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा समावेश आहे. त्यांच्या पक्षाचे मराठवाडा पदवीधरचे आ. सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. हा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटल्यामुळे आ. चव्हाण ‘तुतारी’ हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात प्रसिद्धपत्रक काढले. त्यानंतर पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. आता आ. चव्हाणांचे समर्थक पदाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समर्थक पदाधिकारी पक्षातच राहणारआ. चव्हाण यांचे पक्षातील समर्थक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, युवक काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. दत्ता भांगे यांची नावे आघाडीवर होती. विद्यापीठाच्या राजकारणात आ. चव्हाण यांनी प्रा. मगरे, ॲड. भांगे यांना पदवीधर गटातून अधिसभेवर निवडून आणले. त्यात दोघांनाही व्यवस्थापन परिषदेची संधी दिली होती. मात्र, समर्थक पदाधिकारी आ. चव्हाण यांच्यासोबत जाणार नसून, उपमुख्यमंत्री पवारांच्याच पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार