शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा विवाह करणाऱ्या नवरदेवास बिलोलीत अटक

By admin | Updated: June 13, 2014 00:37 IST

बिलोली : आपला पती दुसरा विवाह करीत असल्याची कुणकुण लागताच नांदेडहून येवून विवाह थांबवण्यापूर्वीच पूर्ण झाल्याने पहिल्या पत्नीने बिलोली पोलिसांत सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार दिली़

बिलोली : आपला पती दुसरा विवाह करीत असल्याची कुणकुण लागताच नांदेडहून येवून विवाह थांबवण्यापूर्वीच पूर्ण झाल्याने पहिल्या पत्नीने बिलोली पोलिसांत सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार दिली़ प्राथमिक शिक्षिका असलेल्या पत्नीच्या तक्रारीनंतर कुंडलवाडी येथील २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नवरदेवास लग्नसमारंभातूनच अटक करण्यात आली आहे़नांदेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका असलेल्या फिर्यादीचे १३ वर्षापूवी कुंडलवाडी येथील प्रभुकांत गंगुलवार यांच्याशी विवाह झाला़ जोडप्यास १२ वर्षाची एक मुलगी आहे़ लग्न झाल्यापासूनच सासरच्या मंडळीनी सदरील शिक्षिकेस मानसिक व शारीरिक त्रास देवून घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकत होते़ दरम्यान, मुलीचा विचार करून पहिल्या पत्नीने नकार दिला व त्रास सहन करीत होती, असे तक्रारी नमुद केले़मंगळवारी आपला पती प्रभुकांत हा दुसरा विवाह करीत असल्याची माहिती मिळाली़ आपल्या आई-वडील व नातेवाईकांना घेवून सासर कुंडलवाडी गाठले, पण पतीसह जवळच्या नातेवाईकांच्या घराला कुलूप होते़ विचारपूस केली तेव्हा प्रभुकांतचा दुसरा विवाह लघूळ ता़ बिलोली येथे होत असल्याचे समजले़ लघूळ येथे पोहचण्यापूर्वीच दुसरा विवाह पार पडला़ पहिली पत्नी जिवंत असताना व घटस्फोटाबाबत कोणतीही प्रक्रिया झाली नसताना दुसरा विवाह केल्याची तक्रार पहिल्या शिक्षिका पत्नीने दिली़ फिर्यादीच्या तक्रारीनुसार पती प्रभुकांत गंगुलवार, सासरे दत्तराम गंगुलवार, चुलत सासरे गंगाधर गंगुलवार, सासू गंगामणी गंगुलवार, सिद्राम गंगुलवार, राजमणी गंगुलवारसह मदत करणाऱ्या २० जणांविर बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)