शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला मरगळ !

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

उस्मानाबाद : तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि तत्कालीन अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी ढेपाळलेल्या रोजगार हमी योजनेला गती देण्याचे काम केले होते.

उस्मानाबाद : तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम आणि तत्कालीन अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी ढेपाळलेल्या रोजगार हमी योजनेला गती देण्याचे काम केले होते. त्यासाठी जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत बैठका घेवून योजनेचे महत्व पटवून दिले होते. त्यामुळेच मजुरांची संख्या लाखाच्या घरात तर कामांची संख्या हजारोवर होती. मात्र आजघडीला हे चित्र पूर्णपणे उलट झाले आहे. मजुरांची संख्या हजारोच्या घरात तर कामांची संख्या शंभराच्या आत येवून ठेपली आहे.मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हाती घेण्यात आली. या योजनेला सुरुवातीचे काही वर्ष चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर या योजनेला उतरती कळा आली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. गेडाम आणि सूर्यकांत गुडेवार यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर रोहयो योजनेचे चित्र अत्यंत चिंताजनक होते. आज जी परिस्थिती निर्माण झाली त्यापेक्षा काही वेगळे नव्हते. त्यानंतर गेडाम आणि गुडेवार या जोडगोळीने या योजनेला गती देण्याचा विडा उचलला. त्यानंतर या दोघांनी मिळून जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यंत संयुक्त बैठका घेवून ग्रामपंचायतींना व यंत्रणेच्या माध्यमातून कामे सुरु करण्याबाबत आव्हान केले होते. कुठेही अडचणी आल्यातरी त्याची सोडवणूक करुन कामे बंद पडू दिली जात नव्हती. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतरस्ते, सिंचन विहीरी आणि अन्य कामेही झाली. मजुरांची संख्या लाखाच्या घरात पोहंचली होती. मात्र आज या योजनेची गत पुन्हा पूर्वीप्रमाणेच झाली आहे. कामांची संख्या शंभराच्या आत येवून ठेपली आहे. तर मजूरांची संख्याही फारसी समाधानकारक नाही. प्रशासनाच्या दप्तरी एकूण कामावरील मजुरांची संख्या ६ हजार ६०३ इतकी अत्यल्प आहे. (प्रतिनिधी)