नारीशक्ती ग्रामपंचायत गाजवणार; सोयगाव तालुक्यात ३६४ पैकी २३४ जागांवर महिला सदस्यांचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:27 IST2021-01-22T15:27:18+5:302021-01-22T15:27:47+5:30
सोयगाव तालुक्यात चाळीस पैकी ३६ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या

नारीशक्ती ग्रामपंचायत गाजवणार; सोयगाव तालुक्यात ३६४ पैकी २३४ जागांवर महिला सदस्यांचा बोलबाला
सोयगाव : चार बिनविरोध ग्रामपंचायतीसह सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. यात एकूण ३६४ सदस्य निवडून आले. या सदस्यांपैकी २३४ महिला सदस्य निवडून आल्याने तालुक्यातील ग्राम पंचायती नारीशक्ती गाजवणार असल्याचे चित्र आहे.
सोयगाव तालुक्यात चाळीस पैकी ३६ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या यामध्ये २३४ जागांवर महिला सदस्यांची वर्णी लागली आहे. मात्र, राखीव प्रवर्गासाठी महिला सदस्यांची कमी असल्याने त्या गावांमध्ये सरपंच पदाची अडचण निर्माण व्होऊ शकते. अनुसूचित जातीसाठी केवळ सात जागांवर महिला सदस्य, अनुसूचित जमातीसाठी-२३, नागरिकांचा मागास प्रवर्ग-४७ आणि सर्वसाधारणसाठी-१२३ महिला सदस्य निवडून आले आहेत. मोठ्या प्रमाणात महिलांनी बाजी मारल्याने तालुक्यातील निम्म्या ग्राम पंचायातींवर महिलांच्या हाती गाव कारभाराची दोरी असणार आहे.