शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळा होणार ई लर्निंग

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

नांदेड : महापालिकेच्या शाळेमध्ये ई लर्निंग शाळेचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू होणार असल्याने पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व दप्तरांचे ओझे

नांदेड : महापालिकेच्या शाळेमध्ये ई लर्निंग शाळेचा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू होणार असल्याने पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व दप्तरांचे ओझे आणण्याची गरज राहणार नाही़ शाळेतच संगणकावर त्यांना अभ्यास आणि गृहपाठ करता येईल़ मनपाच्या उर्दू शाळेसाठीही आवश्यक ते सॉफ्टवेअर उपलब्ध झाल्यास त्यांना देखील या सुविधेने जोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सोमवारी दिली़ शाळेच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वितरण आणि नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम जंगमवडी येथे आयोजित केला होता़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमास उपमहापौर आनंद चव्हाण, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती इतरत फातेमा, उपसभापती पार्वती जिंदम, सदस्या अंजली गायकवाड, नगरसेवक किशोर भवरे, फारूख अली खान, गजानन लासिनकर, संतोष वडगे, नगरसेवक किशोर यादव, फारूख हुसेन, शिक्षणाधिकारी भागवत जोशी, गोविंद करवा, व्यंकटेश जिंदम, सय्यद शोएब यांची प्रमुख उपस्थिती होती़ जी़ श्रीकांत म्हणाले, मनपाच्या शाळेत विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी असल्याने अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न नाही़ शासनास जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरीत करावयाच्या असतील तर संपूर्ण मनुष्यबळ, व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण आणि इमारतीची मालकी महापालिकेकडे द्यावी़ वेतनाचा भार शासनाने उचलावा आणि देखभाल, दुरूस्ती महापालिकेकडे सोपवावी, असा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवला जाईल़ वजिराबाद येथील मनपा शाळेला खेळासाठी मैदान नाही़ याउलट जवळच्या मल्टीपर्पज शाळेत विद्यार्थी संख्या कमी व मैदान रिकामे पडून आहे़ या मैदानाचा मनपाच्या शाळेला उपयोग होऊ शकतो़ इतर खाजगी शाळांचया तुलनेत आम्ही पुढे नसलो तरी मागेदेखील निश्चितच नाही़ ६ ते १४ वयोगटातील कोणीही मुले परिस्थिती किंवा अन्य कारणामुळे बाहेर काम करताना दिसली तर त्याबाबतची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना देऊन त्या मुलांना तुमच्या सोबत शाळेला आणा, असे आवाहन आयुक्तांनी सर्व विद्यार्थ्यांना केले़ (प्रतिनिधी)